शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची फसवणूक करणार्‍या दुकानदारांनो सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:23 IST

अविनाश कदम लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : तालुक्यात महाबीज, निर्मल कंपनीचे उडीद बियाणे व खतांचा दुकानदारांकडून साठेबाजी करून कृत्रिम ...

अविनाश कदम

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टी : तालुक्यात महाबीज, निर्मल कंपनीचे उडीद बियाणे व खतांचा दुकानदारांकडून साठेबाजी करून कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. दरम्यान, नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या आठ कृषी केंद्र चालकांना कृषी विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. यासाठी कृषी विभागाने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

खते, बियाणे मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना दुसऱ्या कंपनीचे बियाणे, खते खरेदी करावी लागत आहेत. काही ठिकाणच्या कृषी केंद्र चालकांकडून बियाणे व खताची चढ्या भावाने विक्री सुरू आहे. यात शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे. कृषी केंद्रचालक मनमानी किंमत आकारून खते, बियाण्यांची विक्री करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला झळ बसत आहे. तोंड पाहून बियाण्यांची व खताची विक्री होत आहे. मालाचा तुटवडा तर मग ओळखीच्या लोकांना संध्याकाळी खते, बियाणे कसे उपलब्ध होते. सर्वसामान्यांना दुकानदार बियाणे शिल्लक नाही, असे सांगतात. असा सवाल शेतकरीवर्गातून विचारला जात आहे.

यावर्षी पाऊस पेरणीयोग्य झाल्याने शेतकऱ्यांनी कापूस लागवड कमी करून उडीद, तूर या पिकाकडे ओढ घेतली आहे. या बियाण्यांची वाढती मागणी पाहता तालुक्यातील काही कृषी केंद्र चालक मागणी असलेल्या महाबीज, निर्मल उडीद बियाण्याचा स्टाॅक करून ओळखीच्या लोकांना चढ्या दराने विक्री करत आहेत. एका पिशवीमागे १०० ते २०० रुपये जादा आकारून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहेत.

आष्टी तालुक्यात खत उपलब्ध असूनसुद्धा खतांचा तुटवडा दाखविला जात आहे. शेतकऱ्यांकडून १०० ते २०० रुपये चढ्या भावाने दर आकारून खताची विक्री सुरू आहे. अनेक कृषी केंद्रांमध्ये दर फलक, स्टॉक बुकही उपलब्ध नाही. दुकानदारांनी साठेबाजी केल्याने बियाणे व खतांचा काळा बाजार होत आहे, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

.....

कृषी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे

तालुक्यातील कोणत्याही कृषी केंद्र चालकांनी कंपनीने जाहीर केलेल्या ग्रेडनिहाय खतांच्या किमतीपेक्षा व बियाण्यांची जास्त दराने विक्री करू नये. शेतकऱ्यांनी एकाच कंपनीचे बियाणे मागून त्याचे महत्त्व वाढवू नका. उपलब्ध असेल ते बियाणे पेरावे. शेतकऱ्यांच्या सह्या न घेतल्याने, भाव फलक न लावलेल्या आठ दुकानदारांना नोटिसा बजावल्या आहेत. आठ दिवसात खुलासा प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व दुकानांची तपासणी करून फसवणूक करणार्‍या दुकानदारा्ंवर कारवाई करण्यात येणार आहे. मंगळवारी कृषी सहाय्यकांनी दुकानांना भेटी दिल्या आहेत. गुरुवारपासून सर्च ऑपरेशन करण्यात येणार आहे. कृषी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना सहकार्याची भूमिका ठेवावी.

- राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी, आष्टी.

....

===Photopath===

090621\img-20210609-wa0242_14.jpg

===Caption===

या फोटोतील दुकानाचे नाव कट करावे