सखाराम शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यातील बेलगुडवाडी परिसरात दोन दिवसांपासून बिबट्यासदृश प्राणी येथील नागरिकांना आढळून आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. भीतीपोटी नागरिक घराबाहेर पडणे टाळू लागले आहेत.बेलगुडवाडी परिसरात दोन दिवसांपूर्वी येथील काही शेतकऱ्यांना बिबट्यासारखा प्राणी दिसला होता. यानंतर पुन्हा शुक्र वार रात्रीच्या दरम्यान काही तरु णांना गावच्या बाजूला असलेल्या कापशी नदी येथे हा प्राणी आढळुन आल्याने परिसरात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत वनविभागाचे वनपाल एस.बी. सातपुते, वनरक्षक देविदास गाडेकर, आर.बी. कोकणेसह अनेकजणांनी परिसरात जाऊन पाहणी केली. गावकºयांनी या प्राण्याच्या पायाचे ठसे असलेले फोटो दाखवले असता हा तडस प्राणी असल्याचा अंदाज वनविभागाच्या वतीने वनरक्षक देविदास गाडेकर यांनी सांगितले. मात्र, ग्रामस्थांचे समाधान झाले नसून बिबट्या असल्याच्या भीतीने नागरिकांनी घराबाहेर पडणे बंद केले आहे.बेलगुडवाडी परिसरात बिबट्यासारखा प्राणी दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी पाहणी केली आहे.नागरिकांनी घाबरून जाऊ नये मात्र सावधगिरी बाळगावी, असे वनविभागाच्या वनरक्षक देविदास गाडेकर यांनी सांगितले.
बेलगुडवाडी परिसरात आढळला बिबट्यासदृश्य प्राणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:29 IST
तालुक्यातील बेलगुडवाडी परिसरात दोन दिवसांपासून बिबट्यासदृश प्राणी येथील नागरिकांना आढळून आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. भीतीपोटी नागरिक घराबाहेर पडणे टाळू लागले आहेत.
बेलगुडवाडी परिसरात आढळला बिबट्यासदृश्य प्राणी
ठळक मुद्देभीतीपोटी नागरिक घराबाहेर पडेनात । वनविभागाच्या अधिकाऱ्यांची केली पाहणी