शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित मातृत्व अभियानात मेट्रो सिटींना मागे टाकत बीड अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:41 IST

माता मृत्यूदर कमी होऊन मुलींचा जन्मदर वाढावा, या उद्देशाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानात पुणे, मंबई आणि औरंगाबादसारख्या मेट्रो सिटींना मागे टाकत बीड जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. खाजगी डॉक्टरांच्या पुढाकारानेच हे शक्य झाले आहे. जिल्ह्यात सध्या ६१ खाजगी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून ६ हाजर १२३ गर्भवती मातांची तपाणी करून उपचार केले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात ६१ खाजगी स्त्री रोग तज्ज्ञांकडून सहा हजार रूग्णांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : माता मृत्यूदर कमी होऊन मुलींचा जन्मदर वाढावा, या उद्देशाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानात पुणे, मंबई आणि औरंगाबादसारख्या मेट्रो सिटींना मागे टाकत बीड जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. खाजगी डॉक्टरांच्या पुढाकारानेच हे शक्य झाले आहे. जिल्ह्यात सध्या ६१ खाजगी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून ६ हाजर १२३ गर्भवती मातांची तपाणी करून उपचार केले आहेत.

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान हाती घेण्यात आले. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये स्त्री रोग तज्ज्ञांची संख्या अपुरी असल्याने गर्भवती मातांची उपचाराअभावी परवड होत होती. दुरवरून त्यांना जिल्हा रूग्णालय गाठावे लागत असे. हाच धागा पकडून आरोग्य विभागाने खाजगी डॉक्टरांना आवाहन करीत स्पवयंसेवक म्हणून सेवा देण्याची विनंती केली. यामध्ये सर्वाधिक प्रतिसाद बीड जिल्ह्यात मिळाल.

तब्बल ८१ डॉक्टरांनी यामध्ये नोंदणी केली. पैकी ६१ डॉक्टरांनी सेवा बजावली असून वेळेनुसार राहिलेले २० डॉक्टर सेवा देत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बीडमध्ये पाटोदा तालुक्यातील नायगाव येथे या अभियानाची सुरूवात झाली होती. ग्रामीण भागातील ६५ आरोग्य केंद्रामध्ये दोन महिन्यात ६१ डॉक्टरांनी ५४७ तास सेवा बजावत ६ हजार १२३ गर्भवती मातांची तपासणी केली आहे.

प्रत्येक गर्भवतीची एक सोनोग्राफी मोफत करून दिल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले. अभियान यशस्वीतेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्यासह अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

बीडच्या यशोगाथेचे पुण्यात कथननॉर्मल प्रसुती आणि सिझर करण्यातही बीड अव्वल राहिले आहे. बीडने कशाप्रकारे नियोजन करून परिश्रम घेतले, याची यशोगाथा २२ जानेवारी रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सकांना सांगण्यात येणार आहे. आरोग्य आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी डॉ.अशोक थोरात यांना याबाबत कळविलेही असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. या दोन अभियानात बीड अव्वल राहिल्याने जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.

१८ जिल्ह्यांची पाटी कोरीचराज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये या अभियानाकडे खाजगी स्त्रीरोग तज्ज्ञांनी दुर्लक्ष केले आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली, परभणीचाही यामध्ये समावेश आहे. तर जालन्यात केवळ एक तर उस्मानाबादमध्ये ९ डॉक्टरांनी पुढाकार घेतला आहे.