शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये रंगरेषेच्या भावविश्वात रमले शहरातील तीनशेवर चिमुकले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 01:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या १४ व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात सोमवारी सकाळच्या सत्रात स्व.शक्तीकुमार ...

ठळक मुद्देराज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात रंगली चित्रकला-पोस्टर स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या १४ व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात सोमवारी सकाळच्या सत्रात स्व.शक्तीकुमार केंडे यांच्या स्मरणार्थ शक्ती प्रतिष्ठान आणि स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने पहिली ते सातवी या बालगटासाठी, तसेच आठवी ते बारावी या माध्यमिक गटासाठी चित्रकला व पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आल्या. सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या विषयावर हळुवार कुंचल्यातून रंगरेषाच्या माध्यमातून भावविश्व साकारले.कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड, सचिव सुशील खटोड, संयोजक भरतबुवा रामदासी महाराज, शक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय केंडे, सचिव मंगलाताई केंडे, माजी मुख्याध्यापक हंसराज पवार, मुख्याध्यापक जे.बी. कुलकर्णी, संयोजक एस.एस. क्षीरसागर, प्रा.श्रीकांत पुरी यांच्यासह जाधव, संजय चौसाळकर, डॉ.विजय क्षीरसागर, सुहास पालीमकर, लक्ष्मीकांत खडकीकर, गणेश स्वामी, केदारनाथ बहिरमल, सुजीत गिराम, शुभम खटोड, आशिष खटोड, महेंद्र बुंदेले, धर्मराज मागदे, संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.या स्पर्धेत आदर्श माध्यमिक विद्यालय, गीता कन्या विद्यालय, गुरुकुल इंग्लिश स्कुल, मिल्लिया हायस्कुल, आदर्श विद्यालय, राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय, बापुजी सांळुके विद्यालय, राष्ट्रीय प्राथमिक विद्यालय, संस्कार विद्यालय आणि चंपावती विद्यालयाचे बाल व माध्यमिक गटातील ३०० विद्यार्थी सहभागी झाले.या विषयावर रेखाटले चित्रपोस्टर व चित्रकला स्पर्धेत बालगटासाठी देशी गाय, माझी शाळा, आणि निसर्ग चित्र हे विषय ठेवण्यात आले, तर माध्यमिक गटासाठी माङया स्वप्नातील सुंदर बीड शहर, झाडे लावा, झाडे जगवा, कॅरिबॅगचे दुष्परिणाम, तसेच उच्च माध्यमिक गटासाठी भ्रष्टाचार भारत देशासाठी शाप, मुलाला मुलगी मिळणार नाही एक समस्या, व्यसनाधीन तरु ण पिढी हे विषय होते. सकाळी १० ते १ या वेळेत या स्पर्धा कीर्तन सभामंडपात पार पडल्या.आज राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी यांचे कीर्तनमंगळवार (दि. २) राष्ट्रसंत स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांचे सायंकाळी ६ ते ८ यावेळेत ‘तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या विषयावर प्रवचन होणार आहे. याप्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.