शहरं
Join us  
Trending Stories
1
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
2
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
3
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
4
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
5
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
6
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
7
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
8
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
9
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
10
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
11
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
12
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
13
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
14
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
15
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

बीडचा करण देशसेवेसाठी हवाई दलात ‘फ्लार्इंग आॅफिसर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 12:50 AM

बीड येथील करण सूर्यकांत महाजन याने भारतीय हवाईदलात ‘फ्लार्इंग आॅफिसर’ बनण्याचा मान मिळविला आहे.

अनिल भंडारीलोकमत न्यूज नेटवर्कबीड : ‘मंजिल उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है’ या ओळी सार्थ ठरवित ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करणा-या येथील करण सूर्यकांत महाजन याने भारतीय हवाईदलात ‘फ्लार्इंग आॅफिसर’ बनण्याचा मान मिळविला आहे. भारतीय सैन्य दलात बीड जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी देशसेवेसाठी यशस्वी कामगिरी केल्याची नोंद आहे. आता हवाई दलातही करणसारख्या उमद्या तरुणांनी पाय रोवले आहेत.

येथील चष्म्याचे व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत महाजन यांचा मुलगा करण याने दहावीपर्यंत येथील सेन्ट अ‍ॅन्स स्कूलमध्ये त्यानंतर बारावीपर्यंत राजस्थानातील कोटा येथे शिक्षण घेतले. या दोन्ही ठिकाणी तो स्टुडंटस् आॅफ द इअर म्हणून बहुमान मिळविला. नंतर हिमाचल प्रदेशातील मंडी येथील आयआयटीमध्ये मॅकेनिकल इंजिनिअरचे २०१७ मध्ये शिक्षण पूर्ण केले. येथे दुस-या वर्षात असतानाच वरिष्ठ वर्गातील मित्राचे व्हिजन पाहून आपणही भारतीय सैन्य दलात काही करुन दाखविले पाहिजे अशी आवड निर्माण झाली.

सेंट्रल डिफेन्स सर्व्हिस (सीडीएस) परीक्षेची तयारी सुरु केली. केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर होणाºया या परीक्षेची २०१६ पासून करणने तयारी सुरु कोली. फेब्रवारी २०१७ मध्ये परीक्षा दिली. सीडीएसच्या लेखी परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर जुलैमध्ये एसएसबीचा टप्पा पार करावा लागतो. पाच दिवस मानसशास्त्र, समूह चर्चा, वैयक्तिक मुलाखत, शारिरीक तंदुरुस्ती या मुद्यांवर ही परीक्षा असते. आॅफिसर लाइक क्वालिटी या कसोटीवर उमेदवाराची खडतर परीक्षा घेतली जाते.

जुलैमध्ये झालेल्या एसएसबीमध्ये पहिल्याच प्रयत्नात करण यशस्वी झाला.सीडीएससाठी दोन लाख उमेदवार तर एसएसबीसाठी ८ हजार उमेदवार पात्र होते. यातून चाळणी होऊन करण पात्र ठरला. सीडीएस आणि एसएसबीमध्ये करणने आॅल इंडिया चौथी रॅँक प्राप्त केली. केंद्रिय लोकसेवा आयोग व भारतीय हवाई दलाच्या वतीने ही एसएसबी टेस्ट होते.

‘आयआयटी म्हणून काय झाले, नेशन स्पीरिट महत्वाचे’आयआयटी केले आहे. मग ते क्षेत्र सोडून इकडे कसा काय? असा प्रश्न विचारण्यात आला. करणनेदेखील तितकेच समर्पक उत्तर दिले. आयआयटी असलो म्हणून काय झाले? नेशन स्पीरिट महत्वाचे आहे. तांत्रिक बाजू आणि कौशल्याचा संगम साधला तर त्याचा फायदा या क्षेत्रातून होऊ शकतो. असे उत्तर करणने देताना त्याच्यामध्ये जाणवणारा आत्मविश्वास टर्निंग पाइन्ट ठरला. त्याला फ्लार्इंग आॅफिसर रॅँक मिळाली. आता पुढील दीड वर्ष तो हैद्राबाद येथील एअर फोर्स अकॅडमीमध्ये प्रशिक्षण व त्यानंतर हवाई दलातील पायलट म्हणून करण देशसेवेसाठी सज्ज होणार आहे.आयआयटीचे शिक्षण घेतानाच करणने एअरफोर्समध्ये जाण्याची इच्छा व्यक्त करुन सल्ला विचारला. प्रायव्हेट जॉब केला तर बºयापैकी पॅकेज मिळेल असे त्याला मी म्हणालो, परंतु , काही गोष्टी मुलांकडून शिकायला मिळतात. ‘पुत्र व्हावा ऐवा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा’ अशा कर्तृत्वामुळे आयुष्यातील उणिवा विसरुन आणखी दहा वर्ष बळ वाढलं अशी भावना करणचे वडील सूर्यकांत महाजन यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.

देशासाठी काहीतरी करण्याची जिद्दपगार, ड्यूटी असा रुटीन जॉब मला करायचा नाही. मला असे काहीतरी करायचे आहे की, ज्यामुळे ५०- १०० जण इन्स्पायर होतील. मनाशी निश्चय केला, घरच्या लोकांनी संमती दिली आणि अभ्यास करून परीक्षांना सामोरे गेलो. यशही मिळाले. देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द बाळगली आहे.- करण महाजन,फ्लाइंग आॅफीसर, एअरफोर्स.