शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हा शल्य चिकित्सकाचा वादग्रस्त आदेश; म्हणे, कर्तव्यावर असताना जीन्स घालायची नाही

By सोमनाथ खताळ | Updated: October 7, 2022 12:20 IST

बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी ३० ऑक्टोबर रोजी एक आदेश काढला. यात त्यांनी कर्तव्यावर असताना टी-शर्ट, जीन्सचा वापर करू नये असे म्हटले आहे.

बीड :बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी एक आदेश काढून वाद निर्माण केला आहे. कार्यालयातील पोशाखाबाबत त्यांनी टी-शर्ट सोबत जीन्स वापरावरही बंदी घातली आहे. ८ डिसेंबर  २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार कार्यालयात केवळ टीशर्ट वापर करू नये, असे स्पष्ट म्हटलेले आहे. परंतू जीन्स वापरण्यावर बंदी घातल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत मॅग्मोने निवेदन देणार असल्याचे सांगितले आहे. 

आरोग्य विभागाच्या आयुक्त पदाचा कारभार तुकाराम मुंढे यांनी स्विकारला. शिस्तप्रीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. ते रूजू होताच त्यांनी डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याच्या सुचना केल्या. तसेच एका बैठकीत कार्यालयीन पोशाखाचाच वापर करावा, असे सांगितले. याच अनुषंगाने बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी ३० ऑक्टोबर रोजी एक आदेश काढला. यात त्यांनी कर्तव्यावर असताना टी-शर्ट, जीन्सचा वापर करू नये असे म्हटले आहे. परंतू ८ डिसेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार सुरूवातीला टी-शर्ट, जीन्स वापरू नये असे म्हटले होते. परंतू त्याच दिवशी पुन्हा सुधारीत निर्णय निघाला. यात केवळ टी-शर्ट वापरू नये असे स्पष्ट म्हटले आहे. असे असतानाही बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी जीन्स वापरावर बंदी घालणारा आदेश काढल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र शासकीय वैद्यकीय अधिकारी संघटनेकडून या प्रकाराबाबत निवेदन देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आता हा आदेश बदलतात की तसाच ठेवला जातो, याकडे लक्ष लागले आहे. 

चुकीचा आदेश शासन निर्णयात केवळ टी-शर्ट वापरावर बंदी घातलेली आहे. परंतू जीन्स वापरू नये, असे कोठेच उल्लेख नाही. असा आदेश जर काढला असेल तर चुकीचे आहे.असे आदेश स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहेत. याबाबत आम्ही निवेदन देऊन आवाज उठवू.- डॉ.नितीन मोरे, कार्याध्यक्ष मॅग्मो संघटना बीड

माहिती घेत आहे या आदेशाबाबत समजले आहे. परंतू त्यात काय काय उल्लेख केला आहे, याची माहिती घेऊन तुम्हाला प्रतिक्रिया देते. - डॉ.कमल चामले, उपसंचालक लातूर

टॅग्स :Beedबीडdoctorडॉक्टर