शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

बीड जिल्हा रुग्णालय आजारी; जागा मिळाली, पण आरोग्य सुविधा कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:04 IST

बीड जिल्हा रुग्णालयाला २०० खाटांच्या नवीन जागेसाठी गृहविभागाकडून गुरुवारी मंजुरी मिळाली. जागा मिळाली, परंतु रुग्णालयात इतर आरोग्य सुविधा कधी मिळणार ? असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडून बीडकरांना मोठ्या अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा रुग्णालयाला २०० खाटांच्या नवीन जागेसाठी गृहविभागाकडून गुरुवारी मंजुरी मिळाली. जागा मिळाली, परंतु रुग्णालयात इतर आरोग्य सुविधा कधी मिळणार ? असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री शुक्रवारी जिल्हा दौºयावर आहेत. कोलमडलेल्या आरोग्य सेवेला सकारात्मक ‘डोस’ देऊन सर्वसामान्यांच्या अपेक्षांवर आश्वासनांचे ‘उपचार’ करतील अशी आशा आहे.

जिल्हा रुग्णालयात दररोज दोन हजार रुग्णांची ओपीडी असते. तसेच निवासी रुग्णांची संख्या ८०० च्या घरात आहे. वास्तविक पाहता रुग्णालयातील कर्मचारी व सुविधांच्या तुलनेत रुग्णांची संख्या तिपटीने आहे. रुग्णालय प्रशासन ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ असे मानून आहे त्या मनुष्यबळावर सुविधा उपलब्ध करुन देत रुग्णांवर उपचार करतात.अनेक वेळा सुविधा व औषधोपचार वेळेवर मिळत नसल्याने जिल्हा रुग्णालयाची प्रतिमा मलीन होत चालली आहे.‘लोकमत’चा पाठपुरावा : पालकमंत्र्यांनी केले प्रयत्नपालकमंत्री पंकजा मुंडे आणि खा. डॉ. प्रितम मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा रूग्णालयाचा विस्तार होत असून जिल्ह्यासाठी २०० खाटांचे रूग्णालय नुकतेच मंजूर झाले आहे. विस्तारित रूग्णालयासाठी जागेचा प्रश्न देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत मार्गी लागला होता. पोलीस विभागाची जागा त्याकरिता उपलब्ध करून देण्याचे त्यांनी मान्य केले होते. पंकजा मुंडे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार बीड शहरातील सर्व्हे क्रमांक १६६ तरफ खोड मधील जिल्हा रूग्णालयाच्या बाजूला असलेल्या पोलीस विभागाच्या ६०९३.५० चौ. मी. जमिनीपैकी ०.९६ हे आर. जमीन आरोग्य विभागाला हस्तांतरित करण्यास गृह खात्याने गुरूवारी मंजूरी दिली. यासंदभार्तील आदेश गृह विभागाचे कार्यासन अधिकारी स्वप्नील बोरसे यांच्या स्वाक्षरीने बीडचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. दरम्यान, जागा हस्तांतरण झाल्याने रूग्णालयाच्या विस्तारीकरणाचा मार्गी लागला आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

सीटीस्कॅन, एमआरआयची प्रतीक्षाजिल्हा रुग्णालयात डिजिटल एक्स-रे, सिटीस्कॅन व एमआरआयची सुविधा नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयाचे दरवाजे ठोठावे लागतात. हीच संधी साधून खाजगी डॉक्टर रुग्णांकडून मनमानी दर आकारुन आर्थिक लूट करतात. यामध्ये सर्वसामन्य रुग्ण भरडले जातात. रुग्णांची हेळसांड, आर्थिक लूट थांबवण्यासाठी तात्काळ या सर्व मशीन उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. मागील अनेक महिन्यांपासून आज-उद्या सुरु होतील अशी आश्वासने प्रशासनाकडून मिळतात. मात्र, अद्यापही त्याचे पालनही झालेले नाही. त्यामुळे ही समस्या गंभीर बनली आहे.

मनुष्यबळही अपुरेचरुग्ण संख्या पाहता जिल्हा रुग्णालयात डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी हे खूपच अपुरे आहेत.त्यातच यातील अनेक पदे रिक्त असल्याने आहे त्या अधिकारी व कर्मचाºयांवर कामाचा ताण वाढतो.हे सर्व हाल टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा रुग्णालयाच्या समस्यांवर ‘उपचार’ करण्याची मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.