शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

बीड जिल्ह्यात मल्टीस्टेटमधील गुंतवणूक ठरली धोक्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 01:19 IST

बीड - अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब मल्टीस्टेटच्या माध्यमातून फोफावला आहे. परिणामी अनेक गुंतवणुकदारांवर ‘शुभकल्याण’ ऐवजी कंगाल होण्याची वेळ आली ...

ठळक मुद्देजिल्ह्यातील गुंतवणूकदारांचे अडकले ७० कोटी

बीड - अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब मल्टीस्टेटच्या माध्यमातून फोफावला आहे. परिणामी अनेक गुंतवणुकदारांवर ‘शुभकल्याण’ ऐवजी कंगाल होण्याची वेळ आली आहे, तर मल्टीस्टेट चालविणाºया पदाधिकाºयांचे ‘जय आनंद’ झाले आहे. एका मल्टीस्टेटमध्ये किमान दहा ते पंधरा कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक आहे. हा आकडा पाहता दोन अब्जाच्या घरात व्यवसाय आहे. बुडीत आणि वादग्रस्त संस्थांमध्ये सामान्य ग्राहकांचे जवळपास ५० ते ७० कोटी रुपये अडकले आहेत. ते परत कधी मिळणार, असा प्रश्न आहे.बीडमध्ये ठेवीदारांना पैसा परत मिळतच नाहीबीड जिल्ह्यात १७० पेक्षा जास्त मल्टीस्टेट संस्थांच्या शाखा कार्यरत असून कोट्यावधींची गुंतवणूक या संस्थांमध्ये ग्राहकांनी केली आहे. पतसंस्थांपेक्षा मल्टीस्टेटच्या नावाखाली मोकळे रान असल्याने अनेकांचे फावले आहे. मागील वर्षभरात भाई हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट व शुभकल्याण मल्टीस्टेट तसेच समृद्धी, पर्ल्स सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांना त्यांचा कष्टाचा पैसा परत मिळत नसल्याने मोठे आर्थिक संकट ओढावले आहे.माजलगावात आमिषपूर्ण मायाजालामुळे भांडवल धोक्यातजास्त व्याजदराची अपेक्षा ठेवून अनेकांनी आपल्या मेहनतीची कमाई मल्टीस्टेटच्या आमिषपूर्ण मायाजालाच्या हवाली केली, मात्र आता एक - एक करुन या मल्टीस्टेट गाशा गुंडाळत असून, शहरातील शुभकल्याण आणि जयआनंद या दोन पतसंस्थांमधील ठेवीदारांचा जीव चांगलाच टांगणीला लागला आहे.माजलगाव शहरात अशाच प्रकारे दिलीप आपेट यांनी स्थानिक पुढारी, प्रतिष्ठीतांना हाताशी धरून येथील जुन्या बसस्थानकासमोर शुभकल्याण मल्टीस्टेट नावाने पतसंस्था टाकली. काहीच दिवसात त्यात येथील अनेक प्रतिष्ठितांनी मोठया प्रमाणात गुंतवणूक केली. नव्याचे नऊ दिवस लोटल्यानंतर या मल्टीस्टेटचे कार्यालय ओस पडले. येथील स्टाफही दिसेना. अनेकांनी थेट अध्यक्षांशी संपर्क साधला असता ते देखील ठेवीदारांची दिशाभूल करू लागले. त्याचप्रमाणे जय आनंद पतसंस्थेविरुद्धही ठेवीदारांनी येथील सहनिबंधकांकडे तक्रारी केल्या होत्या. नंतर या तक्रारीचे काय झाले कोणास कळाले नाही.गाशा गुंडाळलेल्या मल्टीस्टेटच्या विरोधात काही ठेवीदारांनी तक्रार देण्याचे प्रयत्न केले. पोलिसांच्या टोलवाटोलवीमुळे ठेवीदारांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.दोन मल्टीस्टेटला धारूरमध्ये कुलूपशहरात यंदा दोन मल्टीस्टेटला कुलूप लागले. अरविंद मल्टीस्टेटने तर अवघ्या पंधरा दिवसात गाशा गुंडाळला. यामुळे ठेवीदार व नित्यठेव जमा करणाराना मात्र मोठी आर्थिक झळ सहन करावी लागली. ते चकरा मारून बेजार झाले आहेत .शहरात सहा ते सात मल्टीस्टेट आहेत. यापैकी शुभ कल्याण मल्टीस्टेट तर सहा महिन्यांपासून कुलूपबंद आहे. या मल्टीस्टेटमध्ये ज्याच्या ठेवी आहेत ते येथे चकरा मारून बेजार आहेत. सदर पतसंस्था कुलूप लावून भाडे न भरता जागा अडवून ठेवीत असल्याने जागा मालक त्रस्त झाले आहेत.शहरात अरविंद मल्टीस्टेट अवघ्या पंधराच दिवसात कलूपबंद झाली. यामधील ठेवीदार त्रस्त झाले आहेत. नित्यठेव जमा करणारे आपली रक्कम वसूल करण्यासाठी खातेदार मागे लागल्याने पतसंस्थेचे प्रतिनिधीही हैराण झाले ठेवीदारांना चांगलाच चुना लागला आहे. यामुळे इतर मल्टीस्टेटचे व्यवहार मंदावले आहेत.आष्टीत कोट्यवधींच्या ठेवी अडकल्याभाई हिराचंद रायसोनी (बीएचआर), शुभकल्याण, एचबीएन, केबीसी, पर्ल्स यासह इतर योजनेत आष्टी शहरासह तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांच्या कोट्यवधी रूपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. परंतु त्यांची कोठेही नोंद नाही. ठेवी मिळतील याच अपेक्षेवर ठेवीदार असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात दहा वर्षांपासून विविध भागातून आलेल्या मल्टीस्टेटने जास्त व्याज दरांचे अमिष दाखविले. सामान्य गुंतवणूकदारांनी पै-पै जमा करून ठेवी ठेवल्या; यामधील बीएचआर मल्टीस्टेटमध्ये घोटाळा झाल्याने राज्यातील सर्वच शाखांना कुलूप लागले. यात आष्टी आणि कडावासियांचे सुमारे २ कोटी रुपये अडकले.कळंब तालुक्यातील शुभकल्याण मल्टीस्टेटनेही दुकानदारीला कुलूप लावल्याने याही शाखेत दीड कोटी रुपये अडकले आहेत.आष्टी शहरासह तालुक्यात शेजारील जिल्ह्यातील दोन- तीन मल्टीस्टेट आहेत; परंतु तेथे दररोज जमा झालेले पैसे मुख्य शाखेच्या नावावर शाखा व्यवस्थापकाने जमा करायचे अन् मोठा विथड्रॉल आला तर पुन्हा संबंधित मुख्य शाखेकडे मागणी करायची म्हणजेच आपलेच पैसे मिळण्यासाठी दोन दिवस थांबावे लागते.

अंबाजोगाईत पतसंस्थांनीच उभारली बाजारपेठपत निर्माण करून छोट्या छोट्या उद्योग व्यवसायाला मदत करण्याचे धोरण अंबाजोगाईत पतसंस्थांनी राबविले आहे. याचा परिणाम म्हणून की काय, अंबाजोगाई तालुक्यात असणाºया सर्व पतसंस्थांच्या ठेवी १०० कोटींच्या पुढे गेल्या आहेत.सहकार क्षेत्रात अंबाजोगाई तालुक्याने मोठी झेप घेतली आहे. अंबाजोगाई पीपल्स बँक, वसुंधरा महिला नागरी बँक व दीनदयाळ बँक या तीन बँकांनी शहरातून इतरत्र झेप घेतली. या पाठोपाठ नागरी पतसंस्था १९, तर ग्रामीण बिगर शेती पतसंस्था २६ आहेत. याशिवाय ६ मल्टीस्टेट, तर २५ परवानाधारक खाजगी सावकार तालुक्यात आहेत.शहरातील श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेने २५ कोटींच्या ठेवी पूर्ण करून २३ कोटींचे कर्जवाटप केलेले आहे. राजर्षी शाहू पतसंस्थेने १४ कोटींच्या ठेवी पूर्ण करून ९ कोटी कर्ज वाटप केले आहे, तर अंबाजोगाई नागरी सहकारी पतसंस्थेनेही ७ कोटींचे कर्ज शहरात वाटप केले आहे.याशिवाय सन्मती नागरी सहकारी पतसंस्था, योगेश्वरी शिक्षण कर्मचारी पतसंस्था, वीज कामगार पतसंस्था, डॉ. डावळे रुग्णालय कर्मचारी पतसंस्था, स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्था, सानेगुरूजी शिक्षक सहकारी पतसंस्था अशा ५५ पतसंस्था अंबाजोगाई शहर व परिसरात कार्यरत आहेत. मोजक्या ३ ते ४ पतसंस्थांचा अपवाद सोडला तर उर्वरित सर्व पतसंस्थांनी आपला वटवृक्ष फुलिवण्यासाठी झेप घेतली आहे. ज्या सामान्यांना उद्योग व्यवसायासाठी कोणीच कर्ज देत नाही अशा व्यावसायिकांना पतसंस्थेने उभे केले आहे. याची अनेक उदाहरणे समाजात आहेत. नागरी सहकारी पतसंस्था किरकोळ व्यापाºयांना उभे करण्याचे काम करत आहेत. तर शिक्षक पतसंस्थांच्या माध्यमातून अनेकांची घरे नव्याने उभी राहिली आहेत.अंबाजोगाई व परिसरात सामान्य माणसांना अर्थपुरवठा करून पतसंस्थांनी आर्थिक विषमता दूर केली आहे. अर्थसंधारण झाले तर भविष्यात बाजारपेठेत क्रांती निर्माण होऊ शकते. स्थानिक पातळीवर वाढलेली उलाढाल ही गावाच्या विकासाला कारणीभूत ठरते, असे जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष राजू मोरे यांनी सांगितले.

परळीत दोन मल्टीस्टेट संशयाच्या भोवºयातशहरात उघडलेल्या भाई हिराचंद रायसोनी (बी.एच.आर.) व शुभकल्याण मल्टीस्टेट को.आॅप क्रेडीट सोसायटीच्या शाखांना कुलूप असल्याचे शुक्रवारी आढळून आले. त्यामुळे या शाखेत जास्त दरांच्या आमिषाने गुंतविलेले कोट्यवधी रूपये कधी मिळणार? या चिंतेत येथील ठेवीदार असून ते हवालदिल झाले आहेत.बी.एच.आर मल्टीस्टेटची शाखा येथील मार्केट भागात होती. या शाखेत परळीकरांचे दहा कोटींच्या आसपास ठेवी अडकल्या. या प्रकरणी बी.एच.आरच्या संचालकांविरूध्द परळी शहर ठाण्यात गुन्हे ही नोंदविले आहेत. या शाखेतील ठेवी परत मिळाव्यात म्हणून ठेवीदारांनी एक व्यापक बैठकही घेतली होती. परंतु अनेक ठेविदारांचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले. या शाखेचे कार्यालय किरायाच्या जागेत होते. ते येथे ही अस्तित्वात नाही. येथील शुमकल्याण ही मल्टीस्टेट अनेक दिवसापासून बंद आहे. शिवाजी चौकातील कार्यालयाला कुलूप असून समोर गाड्या लावलेल्या आहेत. ही मल्टीस्टेट परळीतील आपेट बंधुंची असून यात ही अनेकांच्या ठेवी अडकल्या आहेत.गेवराईत एक मल्टीस्टेट बंदगेल्या काही वर्षांपासून तालुक्यात खाजगी मल्टीस्टेट व पतसंस्थांचे पेव फुटले असून, तालुक्यात सध्या १० ते १५ मल्टीस्टेट व पतसंस्था सुरू आहेत. या मार्फत करोडो रूपयाच्या ठेवी आजमितीला या बँकांमध्ये जमा आहेत. शहरातील एक मल्टीस्टेट गेल्या एक वर्षापासून बंद झाल्याने शेकडो खातेदारांचे लाखो रुपये यात अडकले आहेत.शहरात काही वर्षांपूर्वी येथील जुन्या बसस्थानकाच्या बाजुला शुभ कल्याण नावाची मल्टीस्टेट सुरू झाली. मात्र, काही काळ सुरळीत झाल्यानंतर ही मल्टीस्टेट गेल्या वर्षभरापासून बंद असून, यात शहरातील व तालुक्यातील अनेक खातेदारांच्या लाखो रूपयाच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. पैसे मिळत नसल्याने खातेदार अडचणीत आले आहेत. या बँकेचे कार्यालय सुरू नसल्याने त्यांच्या ठेवी तशाच्या बँकेत अडकल्या असून, नागरिक बीड शाखेत चकरा मारत आहेत. या १० ते १५ मल्टीस्टेट व पतसंस्थेत आजमितीला हजारो खातेदारांच्या करोडो रूपयाच्या ठेवी जमा आहेत. या ठेवी सुरक्षित आहेत काय, असा प्रश्न आहे.मल्टीस्टेटचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असून, नागरिकांनी खात्री करूनच व्यवहार करावेत असे येथील व्यापारी सुरेश मानधने म्हणाले ग्रामीण व शहरी भागातील नागरिक मल्टीस्टेटच्या आमिषाला बळी पडतात; चांगल्या बँकांची खात्री करूनच ठेवी