शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात बीड जिल्हा कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:21 IST

डाॅ. जे. एन. शेख सिरसाळा (जि. बीड) : उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाच्या सिरसाळा कनेक्शनमुळे बीड जिल्ह्यात चांगलीच खळबळ ...

डाॅ. जे. एन. शेख

सिरसाळा (जि. बीड) : उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाच्या सिरसाळा कनेक्शनमुळे बीड जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. सिरसाळ्यातील मूळ रहिवासी आणि दिल्लीत नोकरी करत असलेल्या इरफान शेखला (वय ३५) यू.पी. पोलिसांनी दिल्लीत अटक केली आहे. इरफानसोबत मौलाना जहांगीर आणि उमर गौतम या दोघा मौलानांना २१ जून रोजी अटक केली असल्याची माहिती समाज माध्यमावरून व्हायरल झाली आहे.

धर्मांतर प्रकरणातील इरफान खान हा आरोपी बीडच्या परळी तालुक्यातील सिरसाळा या गावचा रहिवासी असून, त्याचे प्राथमिक शिक्षण सिरसाळ्यात झाले. त्यानंतर इरफान हा परळीत शिकण्यासाठी होता. माध्यमिक शिक्षण परळीच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण वैद्यनाथ महाविद्यालयात झाले. बारावीनंतर तो मुंबईला शिक्षणासाठी गेला. चार वर्षांपासून तो केंद्र सरकारच्या चाईल्ड वेल्फेअरमधील साईन लँग्वेजसाठी काम करत होता. २०१५ साली परळीतील मुलीसोबत त्याचे लग्न झाले असून, त्यास मूलबाळ नाही. उच्च शिक्षण त्याने मुंबईला पूर्ण केलं आणि त्यानंतर तो दिल्लीला मागील चार वर्षांपासून काम करत होता. काही महिन्यांपूर्वी अहमदाबाद येथील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इरफान खान याला उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाबासकीची थाप मारत पुढील कार्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

हाच इरफान आता धर्मांतर प्रकरणात आरोपी निघाल्याने खळबळ उडाली आहे. मूकबधिर विद्यार्थ्यांना आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याचा प्रकार उत्तर प्रदेशात उघडकीस आला आहे. इरफानचे नाव या सर्व प्रकरणांमध्ये आल्यानंतर शिरसाळा येथील त्याच्या नातेवाइकांना आणि भावांना चांगलाच धक्का बसलाय. इरफान असं काही करू शकत नाही, असा विश्‍वास त्यांना आहे. मात्र, अजूनही फारसे काही बोलणं झालं नाही. समाज माध्यमातूनच आम्हाला माहिती मिळाल्याचं इरफानचा भाऊ फुरखान पठाण यांनी बोलताना सांगितलं. चार वर्षांपासून तो सिरसाळ्यात आला नसल्याचीही माहिती त्यांनी दिली. इरफानला आई, दोन मोठे भाऊ आहेत.

===Photopath===

290621\29bed_15_29062021_14.jpg~290621\29bed_16_29062021_14.jpg

===Caption===

बीड जिल्हा कनेक्शन~बीड जिल्हा कनेक्शन