शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

प्रोत्साहन अनुदान जमा करण्यास बीड जिल्हा बँकेची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:12 IST

जिल्हा बँकेच्या धारूर शाखेत चालू पीक कर्जदार शेतक-यांसाठी शासनाकडून मिळालेली प्रोत्साहनपर रक्कम बचत खात्यात तात्काळ जमा करावी, असे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी बँकेचे मुख्य व्यस्थापक यांना दिले आहेत. मात्र, या आदेशाला पंधरवाडा उलटूनही रक्कम खात्यात जमा झालेली नाही. बँकांकडून यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप शेतकरी करू लागले आहेत.

ठळक मुद्दे शेतक-यांचा आरोप : जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाकडे बँक व्यवस्थापकांनी केले दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कधारुर : जिल्हा बँकेच्या धारूर शाखेत चालू पीक कर्जदार शेतक-यांसाठी शासनाकडून मिळालेली प्रोत्साहनपर रक्कम बचत खात्यात तात्काळ जमा करावी, असे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी बँकेचे मुख्य व्यस्थापक यांना दिले आहेत. मात्र, या आदेशाला पंधरवाडा उलटूनही रक्कम खात्यात जमा झालेली नाही. बँकांकडून यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप शेतकरी करू लागले आहेत.छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना २०१७ अंतर्गत चालू बाकीदार सभासदांची पीक प्रोत्साहन लाभाची १५ ते २५ हजारापर्यंतची रक्कम शासनाने जाहीर केली होती. त्यानुसार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना शासनामार्फत प्राप्त झालेल्या ग्रीन लिस्टमध्ये प्रोत्साहन लाभाची रक्कम धारूर येथील शाखेला प्राप्त झाली होती. सदर रक्कम ही शेतक-यांच्या बचत खात्यात जमा करावी म्हणून आसोला, रुई धारूर, तांदळवाडी, धारूर, जहाँगीरमोहा, धुनकवाड, पांगरी, पहाडी पारगाव येथील शेतकरी व चेअरमन यांनी बँक शाखाधिकारी, सहाय्यक निबंधक कार्यालय व जिल्हा उपनिबंधक यांना २२ डिसेंबर २०१७ रोजी निवेदन दिले होते. त्यानुसार शाखाधिकारी यांनी वरिष्ठांनी आदेश दिल्यास रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा करू असे सांगितले होते.शेतक-यांच्या निवेदनाची दखल घेत जिल्हा उपनिबंधक यांनी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्र देवून सदर प्रोत्साहनपर लाभाची रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा करण्याचे लेखी आदेश २६ डिसेंबर २०१७ दिलेले आहेत. पत्र देवून पंधरवाडा उलटला तरीही अद्याप जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी धारुर येथील शाखाधिकारी यांना शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे आदेश दिले नाहीत. मात्र, शेतकरी प्रोत्साहनपर रक्कम खात्यात जमा झाली का हे पाहण्यासाठी धारुर शाखेत खेटा मारत आहेत.२५ जानेवारीपासून उपोषणाचा इशाराही रक्कम त्वरीत शेतक-यांचे बचत खात्यावर जमा करावी नसता २५ जानेवारी २०१८ रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सेवा सहकारी सोसायटी धारुरचे संचालक सुधीर शिनगारे नितीन शिनगारे, रमेश चव्हाणसह इतरांनी दिला आहे.