शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

छावण्यांकडे बीड जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:32 IST

जिल्ह्यात चारा छावण्याची संख्या ५०० पेक्षा अधिक आहे, छावण्यांचा यापुर्वीचा इतिहास लक्षात घेता निवडणुकीच्या काळात अधिकारी कर्मचारी व्यस्त असल्यामुळे, छावणीमध्ये होत असलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी व योग्य प्रमाणात खाद्य दिले जाते का याच्या तपसणीसाठी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्या मर्गदर्शनाखाली विविध तपाणी पथके नेमण्यात आले आहेत.

ठळक मुद्देभरारी पथकाची पाहणी : सरासरी २५० ते ५०० जनावरं जास्त अहवाल तयार, कारवाई मात्र नाही

बीड : जिल्ह्यात चारा छावण्याची संख्या ५०० पेक्षा अधिक आहे, छावण्यांचा यापुर्वीचा इतिहास लक्षात घेता निवडणुकीच्या काळात अधिकारी कर्मचारी व्यस्त असल्यामुळे, छावणीमध्ये होत असलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी व योग्य प्रमाणात खाद्य दिले जाते का याच्या तपसणीसाठी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्या मर्गदर्शनाखाली विविध तपाणी पथके नेमण्यात आले आहेत. मात्र, भरारी पथकाने दिलेल्या अहवालावर अजून कारवाई झालेली नसल्यामुळे प्रशासनाचे छावण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.निवडणुकीच्या कामकाजात अनेक अधिकारी कर्मचारी व्यस्थ आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी अपर जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात चारा छावणी तपासणीसाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.नडे यांनी विविध छावण्यांना भेटी दिल्या व त्या ठिकाणी तापणी केली यावेळी त्यांनी तपासणी केलेल्या बहुतांश छावण्यांध्ये सरासरी २५० ते ६०० जनावरे जास्त आढळल्याची सूत्रांची माहिती आहे.याचा अहवाल दत्तप्रसाद नडे यांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे दिला आहे. मात्र अजून देखील या अहवालावर कुठलीही कारवाई झालेली नसल्यामुले चारा छावण्यांच्या अनागोंदी कारभाराला अजून चालना मिळाली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार वाढण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. याप्रकरणी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांनी किती छावण्यांवर कारवाई करण्यात आली याची माहिती दिली नाही. ते म्हणाले यासंदर्भात पाहणीदरम्यान आढळलेल्या त्रुटीचा अहवाल वरिष्टांकडे पाठवला असून कारवाई करण्याचा निर्णय ते घेतील अशी माहिती नडे यांनी दिली.मागील महिन्यात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काही छावण्यांना भेट देऊन प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना चारा छावण्यांसंदर्भात सूचना केल्या होत्या. त्यानुसारच तपासणी पथक नेमण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून छावण्यांची तपासणी देखील योग्य पद्धतीने होत आहे. मात्र त्रुटी आढळून देखील कारवाई होत नसल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.नियमांची केली जात आहे पायमल्ली४पशुखाद्य म्हणून ऊस दिला जातो त्याचसोबत दर एक दिवसाआड पेंड देणे बंधनकारक आहे. मात्र अनेक छावण्यांवर पेंड दिली जात नसल्याची माहिती आहे.४त्यामुळे जर असा प्रकार तुमच्या छावण्यांवर देखील होत असेल तर त्याची तक्रार संबंधीत तहसील कार्यालयाकडे करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्याच बरोबर चारा छावणी सुरु करण्यासाठी घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी अनेक छावण्यांवर करण्यात आलेली नाही त्यांचवर देखील कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Beedबीडcollectorजिल्हाधिकारीAgriculture Sectorशेती क्षेत्र