शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये हैद्राबादहून औरंगाबादकडे जाणारा चार क्विंटल गांजा पकडला; एलसीबीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 21:45 IST

हैदराबादहून औरंगाबादकडे जाणारा तब्बल चार क्विंटल गांजा येथील स्थानिक गुन्हे शाखेने पकडला. यामध्ये दोन आरोपींसह १० टायर ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी रात्री आठ वाजता बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथे करण्यात आली.

बीड : हैदराबादहून औरंगाबादकडे जाणारा तब्बल चार क्विंटल गांजा येथील स्थानिक गुन्हे शाखेने पकडला. यामध्ये दोन आरोपींसह १० टायर ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी रात्री आठ वाजता बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथे करण्यात आली. 

हैदराबादहून एका दहा टायरच्या ट्रकमधून (एपी १६ टीवाय १२०६) औरंगाबादकडे गांजा नेला जाणार असल्याची महिती हैदराबाद पोलिसांनी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना दिली. अधीक्षक श्रीधर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांना माहिती देत पथक मांजरसुंब्याकडे रवाना केले. ट्रक केजहून पुढे निघाल्याचे समजताच पाळवदे यांनी मांजरसुंबा येथेच सापळा लावला. रात्री आठ वाजता ट्रक येताच दबा धरून बसलेल्या अधिकारी, कर्मचा-यांनी ट्रकला आपली जीप आडवी लावून ट्रक अडविला. तपासणी केली असता यामध्ये गांजा असल्याचे निष्पन्न झाले.

रात्री उशिरापर्यंत ट्रकमधून गांजा बाहेर काढण्याचे काम सुरू होते. या प्रकरणाची नोंदही झाली नव्हती. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, सपोनि दिलीप तेजनकर, परमेश्वर सानप, नरेंद्र बांगर, रवि गोले, सखाराम सारूक, रूपसिंग राठोड यांनी केली. दरम्यान या मोठ्या कारवाईने खळबळ उडाली असून हा गांजा नेमका कोठे जाणार होता? याचा तपास घेतला जात असल्याचे पाळवदे म्हणाले.

गांजा रस्त्यात केला ‘पार्सल’हैदराबादहून निघाल्यापासून हा गांजा अनेक ठिकाणी विक्री केल्याचा संशय आहे. कारवाईनंतर  पुढे बीड, औरंगाबादला गांजा देण्याचा त्यांचा ‘प्लॅन’ होता, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. ट्रकमधील मुख्य साहित्य उस्मानाबादमध्ये उतरविल्याचेही पोलिसांनी सांगितले.

दुसरी मोठी कारवाईचार दिवसांपूर्वीच बीडमधील पेठबीड भागात ३६ पोती गुटखा पकडल्याची मोठी कारवाई बीड एलसीबीचे पोनि घनश्याम पाळवदे यांनी केली होती. त्यानंतर गांजावर कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले असून या गांजाची ‘साखळी’ बीडमध्ये पोहचत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. संबंधिताचे नावही समोर आले असून त्याचा तपास पोलीस घेत असल्याचे सांगण्यात आले.