शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीसाठी बीड प्रशासन झाले सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:33 IST

बीड जिल्हा पोलीस दलात ५३ जागांसाठी १२ मार्चपासून प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक भास्कर सावंत यांनी जागेची पाहणी केली. भरती पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा पोलीस दलात ५३ जागांसाठी १२ मार्चपासून प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक भास्कर सावंत यांनी जागेची पाहणी केली. भरती पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पोलीस दलाच्या आस्थापनेवरील ५३ जागेसाठी ५ फेब्रुवारीपासून अर्ज स्विकारण्यास सुरूवात झाली होती. ३ मार्च अखेरची तारीख होती. या कालावधीत आठ हजार ३२१ अर्ज आले होते. पैकी सात हजार १७४ पुरूष तर एक हजार १४७ महिलांचा समावेश होता. चुकीची माहिती भरल्याने ८७ उमेदवारी अर्ज अपात्र ठरविण्यात आले होते.दरम्यान, १२ मार्चपासुन प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. यामध्ये कसलीच गडबड गोंधळ होणार नाही, याची दक्षता जिल्हा पोलीस दलाने घेतली आहे.

तसेच ही पारदर्शकपणे भरती पार पाडण्यासाठी त्यांनी नियोजन केले आहे. यासाठी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बो-हाडे हे यावर लक्ष ठेवून असतील. तसेच चार पोलीस उपअधीक्षक, १० पोलीस निरीक्षक, ६० अधिकारी आणि ३०० कर्मचारी याठिकाणी तैनात केले आहेत. पहिल्या दिवशी ७५० उमेदवारांची मैदानी चाचणी होईल. त्यानंतर रोज १ हजार उमेदवारांची चाचणी होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.