शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

बीडच्या पल्स गुंतवणूकदारांना दिल्लीत आशेचा किरण; माहिती अपलोड करा-सेबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:11 IST

: पल्स पॉलीसी (पी. ए. सी. एल.) मध्ये २ हजार ५०० पर्यंतच्या गुंतवणूकदारांनी आपली मूळ कागदपत्रे स्कॅन करुन २८ फेब्रुवारीपर्यंत सेबीच्या वेबसाइटवर अपलोड करण्याचे निर्देशित केले आहे. सदर गुंतवणुकीचा परतावा सिव्हिल अपील १३३०/२०१५ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार वितरीत करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात २ हजार ५०० रुपये गुंतवणुकीपर्यंतचे जवळपास २००० गुंतवणूकदार असून, त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पल्स पॉलीसी (पी. ए. सी. एल.) मध्ये २ हजार ५०० पर्यंतच्या गुंतवणूकदारांनी आपली मूळ कागदपत्रे स्कॅन करुन २८ फेब्रुवारीपर्यंत सेबीच्या वेबसाइटवर अपलोड करण्याचे निर्देशित केले आहे. सदर गुंतवणुकीचा परतावा सिव्हिल अपील १३३०/२०१५ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार वितरीत करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात २ हजार ५०० रुपये गुंतवणुकीपर्यंतचे जवळपास २००० गुंतवणूकदार असून, त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

केंद्रीय वित्त राज्यमंत्री शिवप्रसाद शुक्ल आणि बीड जिल्ह्यातील पल्स पॉलिसी गुंतवणूदार संघर्ष समितीचे शिष्टमंडळ यांच्यात २ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथील केंद्रीय वित्त मंत्रालयात चर्चा झाली. त्यानंतर हे आश्वासन देण्यात आले.बीड जिल्ह्यातील पल्स पॉलीसी गुंतवणूकदार संघर्ष समितीचे शिष्टमंडळ त्यांच्या अडकलेल्या ठेवी परत मिळाव्यात म्हणून २६ डिसेंबरपासून दिल्लीत होते. समितीच्या माध्यमातून पल्सचे १०० गुंतवणूकदार सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा निवेदनात दिला होता.

विविध लोकप्रतिनिधी, मंत्री व अर्थसचिवांची गुंतवणूकदारांनी भेट घेतली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय वित्त राज्यमंत्री शिवप्रसाद शुक्ल यांनी पल्स पॉलीसी गुंतवणूकदार संघर्ष समितीच्या मागणीची सकारात्मक दखल घेऊन भारतीय प्रतिभूती नियमन प्राधिकरणकडे तात्काळ पत्रव्यवहार करीत सदर निर्णय घेण्यास प्रवृत्त केले. तशी अधिकृत माहिती सेबीने संकेतस्थळावरही प्रकाशित केली.

सिविल अपील १३३९४/२०१५ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अमंलबजावणी करण्याची प्रक्रिया तत्काळ करण्याचे आश्वासन केंद्रीय वित्त राज्यमंत्री शिवप्रसाद शुक्ल यांनी भारतीय प्रतिभूती नियमन प्राधिकरणच्या वतीने शिष्टमंडळाला दिले. समन्वयक कुलदीप करपे, मधुकर साळवे, सुनील जेधे, अशोक बहिरवाळ, सीमा दळवी, लक्ष्मी ओव्हाळ आदींसह गुंतवणूकदार या शिष्टमंडळात होते. या आश्वासनामुळे गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.