शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये अर्भकाला बाभळीच्या झुडपात टाकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 02:43 IST

तीन दिवसांच्या अर्भकाला नाळेसह काटेरी बाभळीच्या झुडपात फेकून जन्मदातीने निर्दयतेचा परिचय दिला, तर त्या अर्भकाला रुग्णालयात आणून ग्रामस्थांनी माणुसकीचा परिचय दिला.

बीड : तीन दिवसांच्या अर्भकाला नाळेसह काटेरी बाभळीच्या झुडपात फेकून जन्मदातीने निर्दयतेचा परिचय दिला, तर त्या अर्भकाला रुग्णालयात आणून ग्रामस्थांनी माणुसकीचा परिचय दिला. तालुक्यातील कपीलधारवाडी येथे सोमवारी उघडकीस आलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या अर्भकावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

बीड शहरापासून अवघ्या १० किमी अंतरावर कपीलधारवाडीपासून २०० मीटर अंतरावर एका काटेरी बाभळीच्या झुडपात हे जिवंत अर्भक सकाळी शौचास गेलेल्या नागरिकांना दिसले. त्यांनी तत्काळ ही माहिती पाली येथील पोलीस पाटील वैजिनाथ नवले यांना दिली.पोलीस तेथे पोहोचेपर्यंत ग्रामस्थांनी बाळाला बाहेर काढले. काही महिलांनी ओल्या कपड्याने त्या बाळाचे अंग पुसले, तर एका महिलेने त्याला दूध पाजले. त्यानंतर, बाळास तत्काळ जिल्हा रुग्णालयात आणले. येथे अतिदक्षता विभागात तत्काळ उपचार करण्यात आले. नवले यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

‘लोकमत’च्या वृत्तानंतर महिला पोलीस नियुक्तबाळाला जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देणे गरजेचे होते, तसेच काळजी घेण्यासाठी महिला पोलीस नियुक्त करणे अपेक्षित होते. मात्र, दुपारी १२ वाजेपर्यंत तसे काहीच नव्हते. याबाबत ‘लोकमत’ने आॅनलाइन वृत्त प्रकाशित करताच, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली, तसेच तत्काळ दोन महिला पोलीस कर्मचारीही नियुक्त करण्यात आल्या.