शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये भरदुपारी विद्यार्थ्यांवर तलवारीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:44 IST

दुचाकीवरून महाविद्यालयाकडे जाणाºया दोन विद्यार्थ्यांवर ८ ते १० अज्ञातांनी तलवारीने हल्ला केला. ही घटना गुरूवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मित्र नगर परिसरात घडली. यात दोन्ही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देदोघे जखमी; जुन्या वादातून हल्ला झाल्याचा अंदाज

बीड : दुचाकीवरून महाविद्यालयाकडे जाणाºया दोन विद्यार्थ्यांवर ८ ते १० अज्ञातांनी तलवारीने हल्ला केला. ही घटना गुरूवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मित्र नगर परिसरात घडली. यात दोन्ही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार जुन्या भांडणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविली असून रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद नव्हती.

प्रतीक श्रीधर दोडके (१८ रा.अंकुशनगर, बीड) व उमेश अशोक पांढरे (१८ रा.गयानगर, बीड) असे जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. प्रतीक व उमेश यांचे बीड शहरातीलच माळीगल्लीतील मुलांसोबत दुचाकीचा धक्का लागल्याने वाद होते. याचे रूपांतर गुरूवारी तलवारबाजीत झाले. दुचाकीवरून तोंडाला रूमाल बांधून आलेल्या ८ ते १० तरूणांनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसरात दोन्ही विद्यार्थ्यांना आडविले.

येथे त्यांच्यात बाचाबाची झाली. प्रकरण वाढत असल्याचे समजताच आणि तरूणांची संख्या वाढल्याने या दोन्ही विद्यार्थ्यांनी घटनास्थळावरून पळ काढत केएसके रोड गाठला. येथे भरधाव वेगाने दुचाकीवरून आलेल्या तरूणांनी या दोघांना लाथा बुक्क्याने मारहाण केली. यातील एका तरूणाने आपल्याजवळी तलवार काढून या दोघांवर सपासप वार केले.

दोन्ही विद्यार्थ्यांनी या तरूणांच्या तावडीतून सुटका करून घेत पळ काढला. हे दोन्ही विद्यार्थी पळून गेल्यानंतर हल्लेखोरांनीही घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर येथे बघ्यांची मोठी गर्दी जमली. जवळीलच काही लोकांनी जखमी दोन्ही विद्यार्थ्यांना वाहनातून जिल्हा रूग्णालयात दाखल केले. प्रतिकच्या पाठीवर तर उमेशच्या दोन्ही हातावर वार झाल्याने मोठी जखम झाली आहे. दोघांवरही सध्या जिल्हा रूग्णालयात वॉर्ड क्रमांक पाच मध्ये उपचार सुरू आहेत.

पोलिसांना मिळाली उशिरा माहितीही घटना अतिशय जलद घडल्याचे नागरिकांमध्ये चर्चा होती. जवळीलच काही लोकांनी जखमींना जिल्हा रूग्णालयात आणल्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्याला याची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी रूग्णालयात धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी करून माहिती घेतली. उशिरा माहिती मिळाल्याने हल्लेखोर तरूण पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

जखमींचा जवाब घेणे सुरूउपचार घेत असलेल्या दोन्ही तरूणांचा जवाब घेणे सायंकाळपर्यंत सुरू होते. हल्लेखोर कोण होते? आणि त्यांनी हल्ला का केला? हे यातून समोर येईल, असे पोलीस निरीक्षकनाना साहेब लाकाळ म्हणाले.

परिसरात भितीचे वातावरणऐन गजबजलेल्या आणि महाविद्यालय परिसरातच दुचाकीवरून आलेल्या तरूणांनी विद्यार्थ्यांवर तलवारीने हल्ला केला. त्यानंतर परिसरात व विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.