शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

परळी गोळीबारानंतर बनवाबनवीची ‘स्टोरी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:57 IST

बीड / परळी / अंबाजोगाई : परळी तालुक्यातील जिरेवाडी शिवारातील शेतात देविदास प्रल्हाद मुंडे (२५) या युवकावर शनिवारी गोळी झाडल्याची घटना घडल्याने जिल्हा हादरून गेला आहे. घटनेला दोन दिवस होऊनही रविवारी सायंकाळपर्यंत याची नोंद पोलीस दप्तरी झाली नव्हती. जखमी देविदास मुंडेवर अंबाजोगाईच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. ...

ठळक मुद्देमुख्य कारण गुलदस्त्यातच जिरेवाडीत पोलीस अधिकाºयांकडून घटनास्थळाची पाहणी

बीड / परळी / अंबाजोगाई : परळी तालुक्यातील जिरेवाडी शिवारातील शेतात देविदास प्रल्हाद मुंडे (२५) या युवकावर शनिवारी गोळी झाडल्याची घटना घडल्याने जिल्हा हादरून गेला आहे. घटनेला दोन दिवस होऊनही रविवारी सायंकाळपर्यंत याची नोंद पोलीस दप्तरी झाली नव्हती. जखमी देविदास मुंडेवर अंबाजोगाईच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, जखमी हा खरी माहिती लपवत असून वेगवेगळ्या ‘स्टोरी’ बनवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यामुळे घटनेचे मुख्य कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

देविदास मुंडे याच्यावर अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालयात शनिवारी रात्री शस्त्रक्रिया करुन खांद्याजवळ लागलेली गोळी काढण्यात आली. त्यानंतर रविवारी सकाळी पोलिसांनी त्याची वैयक्तिक भेट घेऊन चौकशी केली असता त्याने वेगवेगळे कथानक रचून तपासात असहकार्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरुवातीला त्याने आपल्यावर झालेला गोळीबार गुटख्यातूनच केलेला आहे असा संशय व्यक्त केला आहे. अनेकांची नावेही त्याने घेतली.

दुपारनंतर पहिली स्टोरी बंद करुन त्याने कोणाकडून तरी मिसफायर होऊन आपल्याला गोळी लागल्याचे कथानक समोर आणले. वास्तविक पाहता ही सर्व बनवाबनवीची उत्तरे असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या पद्धतीने तपासास सुरुवात केली. सहायक पोलीस अधीक्षक विशाल आनंद, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. परंतु तेथे काहीच मिळाले नाही. देविदास मुंडेवर गोळी झाडली की मिसफायर झाले याबाबत ठोस असा पुरावा नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यामुळे तपासाला अद्याप दिशा मिळाली नाही.प्रकरण गुंतागुंतीचे : पोलीस तपासात व्यस्तपोलिसांच्या म्हणण्यानुसार जखमी हा खरी माहिती लपवित आहे. देविदास मुंडेसह इतर तिघे शुक्रवारी रात्री पार्टीसाठी बाहेर गेले होते. तेथेच कोणाकडून तरी मिसफायर होऊन देविदास मुंडे याला पाठीमागून गोळी लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. खरे कारण शोधण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांनी आपली पथके कामाला लावली आहेत.

मोबाइल तपासणीसह मित्रांची चौकशीदेविदास मुंडे ज्या मित्रांसोबत पार्टीला गेला होता त्यांची माहिती काढण्याबरोबरच मोबाइलचे कॉल डिटेल्स् पोलिसांकडून काढले जात आहेत. तसेच रुग्णालयात भेटायला येणाºयांकडूनही माहिती घेतली जात आहे.