शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या लघुपटास केंद्राचा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:57 IST

विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून जनजागृतीसाठी एक लघुपट तयार करण्यात आला होता. या लघुपटास केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या लघुपट महोत्सावात सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे.

बीड : विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून जनजागृतीसाठी एक लघुपट तयार करण्यात आला होता. या लघुपटास केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या लघुपट महोत्सावात सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे. या लघुपटाच्या दिग्दर्शिका आरती बागडी यांनी हैदराबाद येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ््यात बुधवारी हा पुरस्कार स्वीकारला.विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत मतदारांनी भयमुक्त वातावरणात मतदान करावे, तसेच मतदान एका पक्षाला करण्यासाठी कोणी दबाव आणत असेल तर त्या दबावाला कोणीही बळी पडू नये. तसेच कोणी आमिष दाखवून किंवा दबाव टाकत असेल तर, मतदारांनी पोलिसांशी संपर्क साधावा यासाठी जिल्हा पोलीस दलाने जनजागृतीपर लघुपटाची निर्मिती केली होती. या लघुपटात पोलीस दलातील कर्मचारी तसेच स्थानिक कलाकारांनी अभिनय केला होता. या लघुपटास ‘आम्ही दक्ष मतदारांचा पक्ष’ असे नाव देण्यात आले होते. लघुपटाचे दिग्दर्शन आरती बागडी यांनी केले होते.हैदराबाद येथे ग्रामीण भागातील विविध विषयांवर जनजागृती करणाऱ्या प्रदर्शित लघुपटासाठी पुरस्कार वितरण करण्यात येणार होते. यासाठी महोत्सवाचे आयोजन केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने केले होते. यामध्ये विविध राज्यांतील शेकडो लघुपटांचा सहभाग होता. यामध्ये ‘आम्ही दक्ष मतदारांचा पक्ष’ लघुपटास सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाआहे.

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसShort Filmsशॉर्ट फिल्मAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019