शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादची पुनरावृत्ती बीडमध्ये एमआयएम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 23:59 IST

क्षीरसागर काका-पुतण्याने बीड मतदारसंघ भकास केला. बीडचा विकास मजलिस करून दाखविल, असा विश्वास एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.असोदोद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देएमआयएमचे असोदोद्दीन ओवेसी यांना विश्वास : बीडचा विकास मजलिस करून दाखविल

बीड : औरंगाबादच्या जनतेने इतिहास घडवून इम्तियाज जलील यांना निवडून दिले. जलील यांनी तेथील प्रस्थापित शिवसेना नेत्याच्या सत्तेला सुरुंग लावला. आता बीडमध्येही शेख शफीकभाऊ शिवसेनेचा पराभव करून औरंगाबादची पुनरावृत्ती करतील. क्षीरसागर काका-पुतण्याने बीड मतदारसंघ भकास केला. बीडचा विकास मजलिस करून दाखविल, असा विश्वास एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.असोदोद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला.येथील इज्तेमा मैदानावर मंगळवारी बीड विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार शेख शफीक आणि माजलगाव मतदारसंघातील शेख अमर जैनोद्दीन यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मतीन, महेफुजुर रहमान, जिल्हाध्यक्ष शेख निजाम, उमेदवार शेख शफीकभाऊ, शेख अमर यांच्यासह युवक जिल्हाध्यक्ष खयूम इनामदार, नगरसेवक शेख मतीन, हाफिज अशफाक , समीभाऊ, मोमीन अझहर, हरिसन फ्रांसिस, एजाज इनामदार उर्फ खन्नाभाई, शिवाजी भोसकर, सचिन गाडे, हाजी आयुब पठाण आदींची उपस्थिती होती. यावेळी खा. ओवेसी म्हणाले, मजलिसला राजकीय वारसा आहे. ७० वर्षाच्या राजकीय प्रवासाचा इतिहास आहे. त्यामुळे मजलिस कोणाच्या मालकीची नाही. ती सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढत आहे, त्यामुळेच आम्हाला यश मिळत असल्याचे ओवेसी म्हणाले. एमआयएम सेटिंग करते, असा आरोप आमच्यावर केला जातो. मात्र नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे , शरद पवार आपल्या सेटिंगचे काय गुपित आहे ? तेही मला एकदा सांगा, असे खुले आव्हान ओवेसी यांनी दिले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पिक्चर ‘दी एन्ड ’ होत असून या दोघांनाही आता भविष्य नसल्याचे ओवेसी म्हणाले. ट्रीपल तलाकच्या वेळी शरद पवार यांची धर्मनिरपेक्षता कोठे होती, असा सवाल त्यांनी केला. यावेळी त्यांनी तबरेज आणि मॉबलिंचिगच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली. बीडमध्ये भूतबंगला आहे. ज्यांचे केवळ ८०० मतदान आहे, ते बीडवर राज्य करत आहेत. जयदत्त क्षीरसागर आधी राष्ट्रवादीत होते, त्यांनी शिवसेनेत उडी मारली. त्यापाठोपाठ आधी आघाडी केलेले संदीप यांनीही राष्ट्रवादीत उडी मारली. हे दोघेही कुलाटी मास्टर आहेत. एक घर बीडचे भविष्य काय सुधारणार? असा सवाल करत तुम्ही सर्व एक व्हा, आणि मजलिसला साथ द्या. मग भूतबंगल्याची काय अवस्था होते ती पहा , असे खा. ओवेसी म्हणाले. यावेळी सय्यद मतीन, शेख शफीकभाऊ, शेख निजाम, शेख अमर आदींची भाषणे झाली. सभेस एमआयएमचे पदाधिकारी , कार्यकर्ते यांच्यासह हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी