शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

राज्यभरातील शासकीय निवासस्थानातील फळझाडांचा लिलाव करा; बांधकाम विभागाकडे मागणी

By शिरीष शिंदे | Updated: May 8, 2023 16:19 IST

दरवर्षी हंगामानुसार फळांचा लिलाव करुन त्यातून मिळणारे महसूल हा शासनाच्या तिजोरीत जमा करावा

बीड: जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व शासकीय निवासस्थानातील फळांचा लिलाव करुन त्यातून प्राप्त होणारी रक्कम शासनखाती जमा करावी, अशी मागणी यशदा प्रशिक्षक किरण नन्नवरे यांनी बीड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच सदरील निवेदन जिल्हा प्रशासनासही सादर केले आहे.

अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यानंतर संबंधितांना सदरील बंगले त्यांना मिळतात. जिल्हाधिकारी यांच्यासह इतर अधिकारी ज्या शासकीय निवासस्थानात रहातात त्याचा मालक शासन आहे. तसेच शासकीय निवास स्थाने बांधण्याची व नियमित देखभालीचे काम करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असते. दरम्यान, शासकीय निवास स्थानामध्ये आंबा, चिकू, नारळ यासारखी झाडे असतात. या झाडांना मोठ्या प्रमाणात फळे लगडतात. ही फळे सुद्धा शासकीय मालमत्ताच असते. त्यामुळे दर वर्षी हंगामानुसार फळांचा लिलाव करुन त्यातून मिळणारे महसूल हा शासनाच्या तिजोरीत जमा करावा अशी मागणी ननवरे यांनी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात भरपूर आंबेबीड येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यातील आंब्यांच्या झाडास मोठ्या प्रमाणात आंबे लागले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता ही आंबे काढणीला आला असल्याने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या आंब्यांचा नियमानुसार लिलाव करावा असेही ननवरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. शासकीय बंगल्यातील फळे ही स्वत:ची मालमत्ता असल्यासारखा आव काही अधिकारी आणतात पंरतु ही शासकीय संपत्ती असल्याने फळांचा लिलाव करणे योग्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

केवळ बीडमध्येच नव्हे तर राज्यात अवलंब करावाकेवळ बीड शहरातील अधिकाऱ्यांच्या घरी फळझाडे नसून कोकणात फणस, हापूस, काजु या सारखी मोठी फळझाडे आहेत. त्यामुळे राज्यभरात ज्या-ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी फळझाडे आहेत तेथील फळांचा लिलाव जाहीर पद्धतीने करावा अशी मागणी यशदा प्रशिक्षक किरण ननवरे यांनी मुंबई येथील मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :BeedबीडMangoआंबाState Governmentराज्य सरकार