शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात ‘त्या’ केंद्रांवर ठेवावे लागेल यंत्रणेला लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:17 IST

बीड : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मंडळाच्या वतीने बुधवारपासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. ही परीक्षा ...

ठळक मुद्देकॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्याचे प्रशासनासमोर आव्हान; भरारी पथकांची नियुक्ती

बीड : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मंडळाच्या वतीने बुधवारपासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. ही परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षण विभागासह प्रशासनाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. जिल्ह्यात एकही उपद्रवी यंदा नसल्याचे शिक्षण विभागाने सांगितले असले तरी ग्रामीण भागातील नेहमी चर्चेत असणारी ‘ती’ केंदे्र कॉपीमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहेत.

बीड जिल्ह्यात ९० परीक्षा केंद्र असून ३८ हजार ८३८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यात सर्वात कमी विद्यार्थी एमसीव्हीसी आणि वाणिज्य शाखेचे आहेत. तर सार्वाधिक विद्यार्थी हे विज्ञान आणि त्यापाठोपाठ कला शाखेचे आहेत. बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमिवर मागील आठवड्यात जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परीषद प्रशासनातील अधिकारी, शिक्षण विभागाची (दक्षता समिती) बैठक झाली. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे व इतर अधिकारी उपस्थित होते. यामध्ये परीक्षा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, दोन्ही विभागाचे शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आणि विशेष महिला पथक असे मुख्य सहा भरारी पथक परीक्षा व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणार आहेत. याशिवाय स्थानिक स्वंतत्र पथकेही राहणार आहेत.बोर्डाने या परीक्षेत गुण कमी पडले म्हणजे सर्वकाही संपलं असं नाही, वर्ष वाया न जाऊ देता हे गुण सुधारण्याची एक चांगली संधी बोर्डाकडून उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परिक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन शिक्षकांनी केले आहे.

काळजी नका करू, तुम्ही नापास होणार नाहीदहावी-बारावीच्या परीक्षेमध्ये नापास होणा-यांची टक्केवारी खूपच कमी झाली आहे. आपण दहावीच्या परीक्षेमध्ये नापास होऊ, याची एक अनामिक भीती मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना वाटत असते. अशा विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी विभागीय मंडळाकडून जिल्हानिहाय समुपदेशकांचे मोबाइल क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

व्हॉटसअ‍ॅपवरही नजरसोशल मीडिया विशेषत: व्हॉट्सअ‍ॅपवर मागील वर्षी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका फिरली होती. त्यामुळे मुळे या वर्षी खबरदारी घेत वर्गातच १० वाजून ५० मिनिटाला प्रश्नपत्रिकांचे पाकीट उघडण्यात येणार आहे.

परीक्षा केंद्र परिसरात जमावबंदी लागूपरीक्षेमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी, परीक्षा कॉपीमुक्त करण्याकरिता तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बीडचे जिल्हादंडाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रि या संहिता १९७३ चे कलम १४४ (२) अन्वये केंद्र व त्याच्या २०० मीटर परिसरात २१ फेब्रुवारी ते २४ मार्च २०१८ या कालावधीत मनाई आदेश जारी केला आहे. अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी यांच्या व्यतिरिक्त दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास, सर्व झेरॉक्स केंद्र, फॅक्स केंद्र व ध्वनीक्षेपक वाजविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. असा आदेश जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केला आहे.

केंद्रांवर राहणार बंदोबस्तबुधवारी ११ ते २ या वेळेत इंग्रजीचा पहिला पेपर होणार आहे. प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. बारावीची परीक्षा सुरळीतपणे पार पडण्यासाठी केंद्र प्रमुख, अतिरिक्त केंद्र प्रमुख तसेच परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र संचालक तसेच परीरक्षकांना परीक्षा नियमांचे पालन, घ्यावयाची काळजी याविषयी सूचना करण्यात आल्या. परीक्षा केंद्रावर केंद्र संचालकांशिवाय कोणालाही मोबाइल वापर करता येणार नसून, मोबाइल जमा करावे लागतील.