शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

इमारत दुरुस्ती न करताच निधी हडपण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 23:55 IST

येथील सामाजिक न्याय भवनातील दुरुस्तीच्या नावाखाली काम पूर्ण नसतांना देखील कंत्राटदारास देयके देण्याचा घाट सार्वजनिक बांधकाम विभागाने घातला आहे. मात्र, यासंदर्भात तक्रार झाल्यानंतर सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी निधी वर्ग न करण्याच निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देसामाजिक न्याय भवन : अर्धवट कामे असताना ४६ लाखांच्या निधीचे वितरण ?

बीड : येथील सामाजिक न्याय भवनातील दुरुस्तीच्या नावाखाली काम पूर्ण नसतांना देखील कंत्राटदारास देयके देण्याचा घाट सार्वजनिक बांधकाम विभागाने घातला आहे. मात्र, यासंदर्भात तक्रार झाल्यानंतर सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी निधी वर्ग न करण्याच निर्णय घेतला आहे. त्यामुळे योजनेतील कामाचे १ कोटी १३ लाख रुपये निधी अखर्चित राहणार असल्याचे चित्र आहे. सामाजिक कार्यकर्ते अजय सरवदे यांच्या तक्रारीनंतर हे सारे समोर आले आहे. दरम्यान अर्धवट कामे असताना जवळपास ४६ लाख रुपये निधीचे वितरण समाज कल्याण विभागाने केल्याची माहिती आहे.बीड येथील सामाजिक न्याय भवनातील विविध दुरुस्त्यांसाठी १ कोटी १३ लाखाचा निधी मंजूर झाला होता. यात इमारतीतील लिफ्ट आणि इमारत परिसरातील दुरुस्त्या , पार्किंग शेड , पेव्हर ब्लॉक आदींचा समावेश होता. विशेष म्हणजे याला २०१६ मध्ये प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. मात्र अद्याप यातील कामे झालेली नाहीत. मधल्या काळात बांधकाम विभागाच्या उपअभियंता आणि इतर अभियंत्यांना हाताशी धरीत यातील ४० लाखांचे काम झाले असल्याचे पत्र उपअभियंत्यानी दिले.मात्र, यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते अजय सरवदे यांनी तक्रार केली आणि समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक आयुक्तांकडे धाव घेतली. यात कामाच्या चौकशीसाठी समिती देखील गठीत करण्यात आली आहे.आता उपअभियंत्यांनी जरी ४० लाखाचे काम झाले असल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात काम झाले नसल्याचे समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनीही स्पष्ट केले आहे. या दुरुस्तीच्या कामाची बांधकाम विभाग आणि समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त तपासणी केल्याशिवाय देयके अदा करू नयेत अशी भूमिका आता समाजकल्याण विभागाने घेतली आहे.त्याचवेळी उर्वरित निधीही थेट शासनाकडे समर्पित करण्याची तयारी देखील समाजकल्याण विभागाने केली आहे. त्यामुळे सामाजिक न्याय भवनाच्या विकासासाठी आलेला निधी परत जाण्याची शक्यता आहे. तर यासंदर्भात जिल्हाधिकार्यांनीच लक्ष घालून काम करून घेण्याची तसेच खोटे प्रमाणपत्र देणाºया बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी तक्रारदारांनी केली आहे.

टॅग्स :Beedबीडfraudधोकेबाजी