शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा येथील हल्ला पूर्वनियोजित कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:39 IST

कोरेगाव भीमा येथील हल्ला पूर्वनियोजित कट होता. ही घटना सरकार प्रायोजित होती. सरकारच्या ताकदीमुळे एकबोटे, भिडेंनी ही घटना घडवून आणली, आरएसएस ही सर्वात मोठी आतंकवादी संघटना असून त्यावर बंदी घालावी, अशी मागणी बहुजन विकास मोर्चाचे बाबूराव पोटभरे यांनी केली.

ठळक मुद्देबाबूराव पोटभरेंचा डीपीडीसीचा राजीनामा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कोरेगाव भीमा येथील हल्ला पूर्वनियोजित कट होता. ही घटना सरकार प्रायोजित होती. सरकारच्या ताकदीमुळे एकबोटे, भिडेंनी ही घटना घडवून आणली, आरएसएस ही सर्वात मोठी आतंकवादी संघटना असून त्यावर बंदी घालावी, अशी मागणी बहुजन विकास मोर्चाचे बाबूराव पोटभरे यांनी केली.

गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरगाव भीमा प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का बसले आहेत? असा सवाल करुन पोटभरे म्हणाले, ते आरएसएसचे बाहुले आहेत. मुख्यमंत्री म्हणतात, न्यायालयीन चौकशी करु, कसली चौकशी करताय ही तर पळवाट असल्याचा आरोप पोटभरेंनी केला. कोरेगाव भीमा येथील घटनेचे मूळ शोधून कारवाई करण्याऐवजी निषेध, आंदोलन करणाºयांवर कारवाई केली जात आहे. एकबोटे, भिडे यांच्यविरुद्ध देशद्रोहाचा तसेच राहुलच्या मृत्युमुळे खुनाचा गुन्हा दाखल करुन मकोकाअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी या वेळी केली.या वेळी भीम स्वराज्य सेनेचे विकास जोगदंड, दयानंद स्वामी, विजय साळवे, प्रशांत वासनिक, राजेश साळवेसह कार्यकर्ते उपस्थित होते.सरकार जातीयवादी असल्याचा पोटभरेंचा आरोपकोरेगाव भीमा येथील घटनेचा धागा पकडत बहुजन विकास मोर्चाचे बाबूराव पोटभरे यांनी गुरुवारी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. आपले सरकार आंबेडकरद्रोही, जातीयवादी आणि मराठा, दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिमविरोधी असल्यामुळे हा राजीनामा देत असल्याचे पालकमंत्र्यांना दिलेल्या राजीनामापत्रात पोटभरे यांनी स्पष्ट केले.राष्टÑीय स्वयंसेवक संघप्रणीत सत्तारुढ भाजपच्या सरकारने दिलेले कुठलेही पद स्विकारणे म्हणजे आरएसएसच्या संविधान बदलण्याच्या भूमिकेला साथ देण्यासारखे आहे. भाजपा, आरएसएसच्या जातीयवादी मानसिकतेच्या निषेधार्थ राजीनामा देत आहे. याप्रकरणी कुठलीही तडजोड करणार नाही.

पालकमंत्री सामाजिक समतेसाठी काम करत नाहीत, आजपासून नाते तुटल. मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या निषेधार्थ हा राजीनामा आहे, मंत्रीपदी असतोतरी राजीनामा दिला असता. यापुढे सच्चे आंबेडकरी, शिवरायांचे अनुयायी अशा पदांना लाथ मारतील. भाजप, संघाला मदत करणाºयांना पुढची पिढी माफ करणार नाही. यापुढे भाजपविरोधात आपली राजकीय भूमिका राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.

राजू जोगदंड यांचाही राजीनामारिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या आदेशानुसार रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड यांनीही जिल्हा नियोजन समिती सदस्यपदाचा राजीनामा पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कडक शासन करावे, अशी मागणी यावेळी जोगदंड यांनी केली आहे. यावेळी बापू पवार, किशन तांगडे, गोवर्धन वाघमारे, ज्ञानोबा माने, नुरुल खान, सिद्दीक फारोकी, संगिताताई वाघमारे, अविनाश जोगदंड, अमर विद्यागर, गोट्या वीर, प्रा.बाळासाहेब गव्हाणे, अ‍ॅड.श्रीकांत साबळे, भैय्यासाहेब मस्के, गौतम कांबळे, प्रभाकर चांदणे, दिलीप खंदारे, विलास जोगदंड, भाऊसाहेब कांबळे, सतीश शिनगारे, अंकुश गंगावणे, आनंद सरपते यासह जिल्हाभरातील रिपाइंचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.