शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मका फस्त केल्यानंतर ‘लष्करी अळी’चा हल्ला कापूस पिकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 00:06 IST

जिल्ह्यात महत्त्वाचे पीक कापूस हे आहे. मात्र, मागील काही वर्षापासून कापसावर विविध संकट येत आहेत. दोन वर्षापासून सतत दुष्काळ, बोंडअळी व यावर्षी काही प्रमाणात लष्करी अळीचा प्रादर्भाव यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचे आवाहन । संकट रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

बीड : जिल्ह्यात महत्त्वाचे पीक कापूस हे आहे. मात्र, मागील काही वर्षापासून कापसावर विविध संकट येत आहेत. दोन वर्षापासून सतत दुष्काळ, बोंडअळी व यावर्षी काही प्रमाणात लष्करी अळीचा प्रादर्भाव यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी मका पिकावर असेले लष्करी अळीचे संकट मका फस्त केल्यानंतर कापूस या पिकावर येण्याची शक्याता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य उपाययोजना केल्यास प्रादुर्भाव कमी होऊ शकतो असे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी व्यक्त केले आहे.यावर्षी ३ लाख ७७ हजार ३५० हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड झाली आहे. दरम्यान लष्करी अळीचा प्रादुर्भाव हा सर्वात जास्त मका या पिकावर झालेला आहे. या किडीमुळे संपूर्ण पीक धोक्यात येते व नष्ट होते. ही कीड ज्वारी व तृणधान्य वर्गीय पिकांवर असते. मात्र, अनेक ठिकाणी मका पीक हे चाºयासाठी घेतले जात असल्याने कापसाच्या तुलनेत त्याची कापणी लवकर होते. कापूस पिकाच्या तुलनेत मका हे कमी कालावधीचे पिक असल्यामुळे त्याची काढणी लवकर होते. या दोन्ही गोष्टीमुळे मुख्य खाद्य पीक नष्ट झाल्याने लष्करी अळी आपला मोर्चा परिसरातील कापूस व इतर पार्यायी पिकांवर वळवण्याचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे दुष्काळ व नापिकीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांपुढे लष्करी अळीचे नवीन संकट उभा राहिले आहे. मात्र, लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाकडून विविध उपाययोजना सुचवण्यात येत आहेत. त्यामुळे प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार आहे.या उपायायोजना कराव्यातमका पीक काढणीनंतर रोटावेटरच्या सहाय्याने मशागत करावी. त्यापुर्वी शेतातील मेटाराझीयम अनिसोप्ली अथवा नोमुरिया ५ ग्रॅम.प्रति लीटर पाणी याप्रमाणे जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी. तसेच कापूस पिकावर ११.७ एस.सी.०.८ मिली. अथवा क्लोरांट्रानिलीप्रोल १८.५ एससी ०.३ प्रति लीटर पाणी या प्रमाणे त्वरित फवारणी करावी.जैविक नियंत्रण : त्यानंतर एका आठवड्याच्या अंतराने मेटारायझीयम अनिसोप्ली ५ ग्रॅम अथवा नोमुरिया रिलायी ५ ग्रॅम प्रति लीटर पाणी याप्रमाणे जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी. सध्या वातावरण जैविक बुरशीच्या वाढीस अनुकूल असल्याने किडीचे परिणामकारक नियंत्रण मिळण्यास मदत होईल, असे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र