: तालुक्यातील मस्साजोग येथे अशोक भगवान सोनवणे यांच्या शेतातील तुरीचे भुस्कट जाळून नुकसान करून मारहाण केल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात पाच जणांविरूद्ध ॲट्रॉसिटी व अन्य कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २८ एप्रिल रोजी पहाटे नारायण सखाराम धस, परमेश्वर नारायण धस, आशोक नारायण धस, वैजनाथ भागवत धस, रामेश्वर भागवत धस हे सर्व रा. सांगवी ता. केज यांनी संगनमत करून जाळून नुकसान केले. या विषयी अशोक सोनवणे यांनी त्यांना विचारले असता उलट त्यालाच जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्याच्या घरी जाऊन कुटुंबीयांना काठीने मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी अशोक सोनवणे यांच्या तक्रारीवरून आरोपींवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यासह साथ रोग प्रतिबंधक कायदा, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत करीत आहेत.
भुस्कट जाळण्याच्या कारणावरून मारहाण, पाच जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:43 IST