शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
5
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
6
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
7
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
8
संपादकीय: चोंडीचा ‘राजकीय’ घाट
9
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
10
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
11
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
12
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
13
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
14
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
15
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
16
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
17
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
18
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
19
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
20
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना

आष्टी प्रशासन ‘निगेटिव्ह’; कोरोना ‘पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:37 IST

बीड : जिल्ह्यातील पाच तालुक्यांची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला आष्टीने जिल्ह्याची चिंता वाढविली आहे. या एका ...

बीड : जिल्ह्यातील पाच तालुक्यांची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला आष्टीने जिल्ह्याची चिंता वाढविली आहे. या एका तालुक्यात तब्बल १७३ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. येथील प्रशासन उपाययोजना करण्यात निगेटिव्ह असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच कोरोना पाॅझिटिव्ह होत चालला आहे. याच तालुक्यात रुग्ण विनापरवानगी होम आयसोलेट राहत असल्यानेच संसर्ग वाढत असल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी बीड आणि आष्टी तालुक्याने चिंता कायम ठेवली आहे. आष्टीत यापूर्वीही रुग्णसंख्या वाढत असल्याचे पाहून आरोग्य विभागाने बीडमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनुभवी लोकांना आष्टीत पाठविले होते. यात जवळपास ८० लोक हे विनापरवानगी होम आयसोलेट राहिल्याचे उघड झाले होते. ही गंभीर बाब लक्षात आल्यावर खुद्द मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तालुका पिंजून काढत रुग्णांना शोधून रुग्णालयात, कोविड सेंटरमध्ये दाखल केले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांचीही कानउघाडणी केली होती. काही दिवस सुरळीत चालले; परंतु आता पुन्हा आष्टीने चिंता वाढवायला सुरुवात केली आहे. सर्वात जास्त रुग्ण आष्टी तालुक्यात असून, यातील बहुतांश लोक आजही विनापरवानगी घरीच राहत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. एवढे गंभीर असतानाही आष्टी प्रशासन गप्प का, असा सवाल उपस्थित होत आहे.

--

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कागदावरच

गत दोन महिन्यांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी होम आयसोलेशन बंद केल्याचे आदेश काढले होते; परंतु आष्टी तालुक्यासाठी हे आदेश कागदावरच आहेत. रोज आढळणाऱ्या रुग्णांपैकी १० पेक्षा जास्त रुग्ण होम आयसोलेट राहत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

--

जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिसाद नाही

जिल्ह्यातील तक्रारी आणि माहितीसंदर्भात काही लोक थेट जिल्हाधिकारी राधाबिनोध शर्मा यांच्याशी संपर्क करतात; परंतु त्यांच्याकडून कसलाही प्रतिसाद दिला जात नसल्याचे दिसून येते. त्यांच्यानंतरच्या अधिकाऱ्यांना संपर्क करूनही परिस्थिती ‘जैसे थे’च असते. त्यामुळे तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांची तक्रार करायची कोणाकडे, असा सवाल उपस्थित होत आहे. शुक्रवारीही शर्मा यांच्याशी दोन वेळा संपर्क केला; परंतु त्यांनी फोन घेतला नाही.

--

आमच्याकडे लसीकरण कमी झालेले आहे. आता गावनिहाय लसीकरण शिबिर घेत आहोत, तसेच होम आयसाेलेशनबाबत आम्ही सर्वांना आवाहन करून सीसीसी अथवा रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न करीत आहोत. काही रुग्ण सहकार्य करीत नाहीत. आता हा अहवाल वरिष्ठांना पाठविला जाईल.

डॉ. जयश्री शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी, बीड

---

अशी आहे आकडेवारी

तालुका एकूण रुग्ण कोरोनामुक्त ॲक्टिव्ह रुग्णमृत्यू

अंबाजोगाई १४१७४ १३५९६ ४७ ५३१

आष्टी १२९७५ १२४८२ १७३ ३२०

बीड २४९९१ २४२७६ १४ ५७९

धारूर ४७०८ ४५६५ १४ १२९

गेवराई ७८८८ ७६७७ २३ १८८

केज ९६१४ ९२६३ ६८ २८३

माजलगाव ५९८७ ५७५३ १७ २१७

परळी ७१३८ ६८८५ ६ २४७

पाटोदा ५९८७ ५८३९ ३५ ११३

शिरूर ५४८८ ५३९७ १० ८१

वडवणी ३२९० ३१८० ५२ ५८