शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

आशा सेविका बनल्या आरोग्य व्यवस्थेचा कणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST

अंबाजोगाई : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. या संकटांच्या स्थितीतही खेडोपाडी स्वतःचा जीव धोक्यात घालून अविरत सेवेचे ...

अंबाजोगाई :

ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. या संकटांच्या स्थितीतही खेडोपाडी स्वतःचा जीव धोक्यात घालून अविरत सेवेचे व्रत आशा सेविका बजावताना दिसत आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ग्रामस्तरावर नागरिक आणि आरोग्य विभाग यांच्यातील दुव्याचे काम हा कर्मचारी वर्गच करीत आहे.

अंबाजोगाई पंचायत समितीच्या आरोग्य विभागात ९९ ग्रामपंचायती व १०५ गावांचा समावेश आहे. एक हजार लोकसंख्येच्या मागे एक आशा सेविका कर्मचाऱ्याची नेमणूक करता येते. या तालुक्यात एकूण सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २१८ आशा कर्मचारी व १२ गटप्रवर्तक काम करीत आहेत.

आशा सेविकांची नियुक्ती करताना ती विवाहित असावी, ही अट आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्यविषयक सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख त्यांनी कोविड काळातही जपली आहे. २०२० साली कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर झाला. त्यावेळी नेहमीच्या कामापेक्षा अधिक कार्य करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. पहिल्या लाटेत कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कात येण्याचे दिव्य काम त्यांना करावे लागले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आरोग्य विभागाला शासनाने दिलेली जबाबदारी सार्थ करून दाखवली. आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत जाऊन बधितांप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांच्या तपासण्या करणे, त्यांना गोळ्या वाटणे, हे सर्व करताना त्यांना मानसिक आधार देण्याचे महत्त्वाचे कामही आशा सेविकांनी केले आहे. ही कामे करताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब लोमटे, तहसीलदार विपीन पाटील, गटविकास अधिकारी संदीप घोणसीकर यांची त्यांना मदत होत आहे.

कोरोना सर्वेक्षणासाठी थर्मल गन आणि ऑक्सिमीटर त्यांच्याकडे सोपवून घरोघरी प्रत्येक कुटुंबातील सदस्याची माहिती नोंदविण्याचे कार्य देण्यात आले. ते करताना प्रत्येक वेळी साहित्य हाताळून निर्जंतुकीकरण, नोंदी टिपताना संवाद कौशल्य वापरावे लागले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गृहविलगीकरणाच्या कामाची जबाबदारीही वाढली आहे.

....

तुटपुंज्या मानधनावर काम

कोविडच्या विशेष जबाबदारीबद्दल त्यांना एक हजाराचे मानधन दिले जाते. हे मानधन खूपच कमी आहे. कमी मानधनाचा बाऊ न करता समाजसेवेचे हे व्रत अविरत सुरूच आहे. शिवाय केंद्र व राज्य सरकारच्या विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती व अंमलबजावणीत त्यांचा मोठा वाटा आहे. विविध ६५ प्रकारची कामे त्यांच्यामार्फत सुरू आहेत.