शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

सराफा व्यापा-याला चिरडणा-या कोल्हापूरच्या ‘आर्या गँग’चा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:44 IST

केज तालुक्यातील कुंबेफळ येथील सराफा व्यापारी विकास थोरात यांना कारने चिरडून दागिन्यांची बॅग लुटणा-या कोल्हापूरच्या ‘आर्या गँग’चा अवघ्या चार तासांत बीड पोलिसांनी पर्दाफाश केला. टोळीच्या म्होरक्यासह चौघांना मंगळवारी मध्यरात्री गजाआड केले. तसेच चोरीतील मुद्देमालही हस्तगत केला आहे.

ठळक मुद्देम्होरक्यासह चौघे गजाआड ; बीड पोलिसांची कामगिरी, मुद्देमालही जप्त

बीड : केज तालुक्यातील कुंबेफळ येथील सराफा व्यापारी विकास थोरात यांना कारने चिरडून दागिन्यांची बॅग लुटणा-या कोल्हापूरच्या ‘आर्या गँग’चा अवघ्या चार तासांत बीड पोलिसांनी पर्दाफाश केला. टोळीच्या म्होरक्यासह चौघांना मंगळवारी मध्यरात्री गजाआड केले. तसेच चोरीतील मुद्देमालही हस्तगत केला आहे.

अमोल उर्र्फ आर्याभाई संभाजी मोहिते (३५ रा.कापशी ता.कागल, जि.कोल्हापूर), अमर लक्ष्मण सुतार (३९ रा.महादेव गल्ली रा.निपाणी जि.बेळगाव), महादेव रमेश डोंगरे, (२१ रा.सोनीजवळा ता.केज, जि.बीड), अतुल रमेश जोगदंड (२० रा.सोनीजवळा ता.केज, जि.बीड) अशी ताब्यात घेतलेल्या चोरट्यांची नावे आहेत. अमोल हा टोळीचा म्होरक्या आहे. व्यापारी विकास थोरात हे दुचाकीवरून घरी जात असताना मंगळवारी रात्री या टोळीने त्यांना कारखाली चिरडून ठार केले व सोन्या-चांदीच्या दागिन्यांची बॅग लुटली.

माहिती समजताच पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत नाकाबंदी केली. पहाटे चार वाजेपर्यंत सर्व चोरट्यांना मुद्देमालासह गजाआड केले. ही कारवाई पोलीस जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, धारूरचे पोलीस निरीक्षक जे.एल.तेली, केजचे पोलीस निरीक्षक एस.जे.माने, अंबाजोगाई ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गंधम, युसूफवडगावचे सपोनि राहुल देशपांडे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचा-यांनी केली.

कुख्यात अमोलवर कोल्हापुरमध्ये ‘मोका’अमोल मोहिते हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत गंभीर २० च्या वर गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्यावर कोल्हापूरमध्ये मोका लावण्यात आलेला आहे. कोल्हापुरसह इतर ठिकाणी तो ‘वॉन्टेड’ होता.

नागरिकांचे सहकार्य आणि अधिकारी, कर्मचा-यांचे परिश्रमघटनेची माहिती मिळताच नाकाबंदी करून शोध मोहीम हाती घेतली. नागरिकांचे सहकार्य आणि अधिकारी, कर्मचा-यांच्या परिश्रमामुळे टोळीला गजाआड करता आले.जी.श्रीधरपोलीस अधीक्षक, बीड