शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

नेकनूर स्त्री रुग्णालयात पीएसआयला अरेरावी; महिला डॉक्टरची उचलबांगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:34 IST

बीड : गुन्ह्यातील आरोपींना घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला महिला डॉक्टरने अरेरावी केली. तसेच याच महिला डॉक्टरविरोधात आलेल्या ...

बीड : गुन्ह्यातील आरोपींना घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला महिला डॉक्टरने अरेरावी केली. तसेच याच महिला डॉक्टरविरोधात आलेल्या तक्रारींचा ढिगारा पाहून त्यांची तातडीने उचलबांगडी करत माजलगाव ग्रामीण रुग्णालयात बदली करण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

डॉ. शेख नाजिया असे या महिला डॉक्टरचे नाव आहे. नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव हे शुक्रवारी आरोपींना न्यायालयात हजर करायचे असल्याने नेकनूर स्त्री रुग्णालयात आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी गेले होते. तेथे एकही डॉक्टर हजर नव्हते. संबंधित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावरील डॉ. शेख नाजिया यांना संपर्क करून बोलावून घेतले. यावर त्या चांगल्याच संतापल्या. सारखा काय त्रास देता, कशाला येता इकडे, असे म्हणत तपासणी करण्यास हलगर्जी केली. तसेच मी नसताना आले म्हणून उपनिरीक्षक जाधव यांना अरेरावी केली. ही बाब त्यांनी वरिष्ठांना कळविल्यानंतर लगेच जिल्हा शल्यचिकित्सकांनी धाव घेत खात्री केली. यावर आतापर्यंतच्या सर्व तक्रारी आणि या तक्रारीतील चौकशी करून डॉ. शेख नाजिया यांची उचलबांगडी करत माजलगाव ग्रामीण रुग्णालयात बदली केली. याने उद्धट वागणूक देणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार

या प्रकरणाची सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. यात संबंधित डॉक्टरवर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

---

आमचे अधिकारी आरोपींना घेऊन रुग्णालयात गेले. तेथे डाॅक्टर हजर नव्हते. एक महिला डॉक्टर आल्यावर त्यांनी आमच्या अधिकाऱ्यांना उद्धट वागणूक देत अरेरावी केली. वैद्यकीय तपासणीस उशीर झाल्याने आरोपींना न्यायालयात हजर करायला वेळ लागला. आम्ही लेखी तक्रार केली नाही, परंतु, सीएस यांना तोंडी कळविले आहे.

लक्ष्मण केंद्रे, सहायक पोलीस निरीक्षक, नेकनूर

--

नेकनूर रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या तक्रारी वाढल्या होत्या. या प्रकरणात काय तथ्य, याची चौकशी केली जाईल. तोपर्यंत डॉ. शेख नाजिया यांची माजलगाव ग्रामीण रुग्णालयात बदली केली आहे.

डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

140821\14_2_bed_11_14082021_14.jpeg

नेकनूर रूग्णालयातील प्रकार समजल्यावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी धाव घेत चौकशी केली. यावेळी डॉ.बाबासाहेब ढाकणे, तक्रारदार डॉ.गणेश ढवळे आदी.