शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

घोषणा जिव्हारी लागल्यानेच मला पदावरून केले कार्यमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:47 IST

गेल्या बावीस वर्षापासून राजकारण आणि समाजकारणात काम करत आलो आहे, ज्या नेत्यासोबत एवढी वर्षे काढली, त्या नेत्याने माझ्या समर्थनार्थ दिलेल्या घोषणा एवढ्या जिव्हारी लावून घेतल्या की मला त्यांनी तात्काळ युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून कार्यमुक्त केले, हे तुम्हाला आवडले का? असा प्रश्न राजेंद्र मस्के यांनी समर्थकांना आ. विनायक मेटे यांचे नाव न घेता विचारला.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांना मोठे होऊ दिले नाही : राजेंद्र मस्के यांची विनायक मेटेंवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गेल्या बावीस वर्षापासून राजकारण आणि समाजकारणात काम करत आलो आहे, ज्या नेत्यासोबत एवढी वर्षे काढली, त्या नेत्याने माझ्या समर्थनार्थ दिलेल्या घोषणा एवढ्या जिव्हारी लावून घेतल्या की मला त्यांनी तात्काळ युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून कार्यमुक्त केले, हे तुम्हाला आवडले का? असा प्रश्न राजेंद्र मस्के यांनी समर्थकांना आ. विनायक मेटे यांचे नाव न घेता विचारला.राजेंद्र मस्के मित्र मंडळाच्या वतीने बीड विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक चºहाटा रोड येथील तुकाराम गुरुजीनगर या ठिकाणी सोमवारी आयोजित केली होती. यावेळी राजेंद्र मस्केंचे जवळपास चार हजार समर्थक कार्यकर्ते जमा झाले होते.याप्रसंगी बंजारा समाजाचे नेते दिनेश पवार, सोमनाथ माने, संजय नलावडे, शहाजी गायकवाड, संघर्ष वडमारे, आहेर वडगावचे सरपंच पोपटराव रोहिटे, आंबेसावळीचे सरपंच प्रदीप गुंदेकर, पिंपरगव्हाणचे सरपंच बाबासाहेब शेटे, खंडाळाचे सरपंच चौरे, वाकनाथपुरचे सरपंच गोरख घाडगे, शिरापूर गात उपसरपंच बाळू गात, घोसापुरी सरपंच रामाराव बांड, हाजीपुर सरपंच रावण ठोंबरे, उमरद खालसाचे सरपंच बापूराव जाधव, तळेगाव सरपंच नारायण ढोरमारे, पिंपरनाई सरपंच बाळासाहेब वायभट, लहू देवकर, अभिजीत गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा ‘बीड का आमदार कैसा हो, राजेंद्र मस्के जैसा हो’ अशा घोषणा देऊन परिसर दणाणून काढला होता. मी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली म्हणून मला राजकीय किंमत चुकवावी लागत आहे. पण तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ. जनतेची साथ असेपर्यंत ‘मी कुणाच्याही बापाला भीत नाही’ या शब्दात राजेंद्र मस्के यांनी पुढील राजकीय भूमिकेवर भाष्य केले.या बैठकीत बोलताना मस्के असे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी आयुष्यभर कार्यकर्ता रहावे, जसं की गड्याने कधी मालकच होऊ नये, या उक्तीप्रमाणे ते माझ्याशी वागले आहेत. परंतु आजपर्यंत काम करत असताना जनता जनार्दनाच्या आशीर्वादामुळेच दोन दोन वेळा आम्ही निवडून आलो, त्यामुळे निवडणुका कशा जिंकायच्या हे आम्हाला चांगलेच माहीत आहे. इतरांनी आम्हाला शिकवू नये, असे ते म्हणाले.

टॅग्स :BeedबीडPoliticsराजकारणVinayak Meteविनायक मेटे