शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांचा आकडा फुगणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:01 IST

दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना चारा,पाण्याची व्यवस्था योग्य व्हावी यासाठी शासनाने चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे७८२ छावण्यांना मंजुरी : छावण्यांची वाढती संख्या प्रशासनाच्या कसोटीची ठरणार

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना चारा,पाण्याची व्यवस्था योग्य व्हावी यासाठी शासनाने चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पालकमंत्र्याच्या संमतीने मंजूर झालेल्या ३४० व प्रशासनाने मंजुरी दिलेल्या एकूण ७८२ पेक्षा अधिक छावण्यांची संख्या आहे. त्यामुळे वाढलेल्या चारा छावण्यांच्या संख्येसोबतच प्रशासनाची देखील डोकेदुखी वाढणार आहे.चारा छावणी सुरु केल्यानंतर शासनाने घालून दिलेल्या निकषांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाने देखील योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक आहे. मात्र काही सुरु असलेल्या छावण्यांचे आलेले अहवाल पाहता छावणीवरील जनावरांची संख्या व त्या तालुक्यात किंवा परिसरात असलेल्या जनावरांची संख्या यामध्ये तफावत असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच अनेक ठिकाणी चारा छावण्या मंजूर होऊन देखील सुरु झालेल्या नाहीत, त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. एकाच गावामध्ये एकापेक्षा अधिक छावण्या देखील मंजूर केल्या आहेत. त्या ठिकाणचा पेच सोडवण्याचे तसेच मंजुरी मिळालेल्या छावण्यांची संख्या व त्यावर नियंत्रण ठेऊन गैरप्रकार टाळण्याचे प्रशासनापुढे आव्हान असणार आहे.एका छावणीत सरासरी ३०० ते ५०० जनावरेबीड तालुक्यातील लहान मोठ्या जनावरांची संख्या १ लाख १५ हजार ९९१ आहे, यासाठी २९३ चारा छावण्या मंजुर करण्यात आल्या आहेत. जनावरांची संख्या व छावण्यांचा हिशेब केला तर सरासरी ४०० जनावरं एका छावणीत असणार आहेत. तसेच आष्टी तालुक्यातील छावण्याची संख्या २७७ व जनावरांची संख्या १ लाख २४ हजार ५१० या प्रमाणे प्रत्येक छावणीत ४५० जनावरं असणे अपेक्षित आहे. त्यामुळे छावण्यांधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रशासनाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.बीड जिल्ह््यातील जनावरांची संख्या : ८ लाख २२ हजारशासकीय आकडेवारीनूसार जिल्ह्यातील लहान-मोठ्या जनावरांची संख्या ८ लाख २२ हजार इतकी आहे. यामध्ये माजलगाव ,परळी, धारुर, अंजाबाजोगाई या तालुक्यातील छावण्यांची संख्या १० पेक्षा कमी आहे. सर्वाधिक छावण्या बीड, आष्टी व गेवराई तालुक्यात आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र