शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राक्षसभुवनची प्राचीन मंदिरे गोदावरीच्या पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 18:38 IST

तुडूंब वाहत असलेल्या या नदीचे हे रुपडे पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

ठळक मुद्दे पाचांळेश्वर येथील आत्मतीर्थ पूर्णपणे व राक्षसभुवन येथील शनि महाराज मंदिर अर्धे पाण्याखाली गेले

गेवराई (जि. बीड) : जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. या सोडलेल्या पाण्यामुळे गेवराई तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या पाचांळेश्वर येथील आत्मतीर्थ पूर्णपणे व राक्षसभुवन येथील शनि महाराज मंदिर अर्धे पाण्याखाली गेले आहे. तुडूंब वाहत असलेल्या या नदीचे हे रुपडे पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

पैठण येथील नाथसागर आज मितिला १०० टक्के भरल्याने उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यानंतर जलविद्युतमधून पाणी सोडले होते. परत आवक वाढल्याने रविवारी धरणाचे १६ दरवाजे अर्धा फुटाने उघडून गोदावरी नदीपात्रात १२ हजार क्युसेस पाणी सोडले होते. सध्या एकूण ६८२९ क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. 

गेल्या अनेक वर्षानंतर पैठण येथील नाथसागर आजमितिला पूर्ण क्षमतेने १०० टक्के भरल्याने दोन दिवसांपूर्वी उजव्या, डाव्या कालव्यात व जलविद्युत केद्रातून पाणी सोडले होते. तर रविवारी रात्री नाथसागरातून १६ दरवाजे अर्धा फुटाने उघडून गोदावरी नदीपात्रात १२ हजार क्युसेस विसर्ग सोडण्यात आला होता. तो कमी करुन मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा सोमवारी  धरणाचे १२ दरवाजे अर्धा फुटाने उघडून ५२४० क्युसेक, जलविद्युत केंद्रातून १५८९ असा एकुण ६८२९ क्युसेक पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील ३२ गावांत गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. या सोडलेल्या पाण्यामुळे तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या पांचाळेश्वर येथील आत्मतीर्थ दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. तसेच शनिदेवाच्या साडेतीन पीठापैकी एक पीठ असलेल्या राक्षसभुवन येथील मंदिरातील शनि महाराज यांच्या मूर्ती अर्ध्या बुडाल्या आहेत.

३२ गावांना सावधानतेचा इशारातालुक्यातील ३२ गावांतील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदी पात्रात जावू नये, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही आपत्कालिन स्थितीला सामोरे जाण्यासाठी महसूलचे पथक तयार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने भाविक भक्तांनी नदीपात्रातील पाचांळेश्वर येथील आत्मतीर्थ दत्ता मंदिरात दर्शनाला जावू नये.- विजयकुमार गुर्जर बाबा, महंत, पांचाळेश्वर

टॅग्स :godavariगोदावरीJayakwadi Damजायकवाडी धरणfloodपूरBeedबीड