शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

तारण योजनेतील मुगाची रक्कम एक वर्षानंतर शिजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तब्बल एक वर्षापूर्वी तारण ठेवलेल्या २२ शेतकऱ्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धारूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तब्बल एक वर्षापूर्वी तारण ठेवलेल्या २२ शेतकऱ्यांच्या मुगाची ३० टक्के राहिलेली हमीभावाची रक्कम अखेर मिळाली. या रकमेचे धनादेश बाजार समितीने संबंधित शेतकऱ्यांना दिले. शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे ही रक्कम मिळाली असून, हमीभावाने मुगाची रक्कम देणारी धारूर बाजार समिती ही एकमेव ठरली आहे.

तालुक्यातील चिखली व देवठाणा येथील २२ शेतकऱ्यांनी त्यांचा ७० क्विंटल मूग धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे धान्य तारण योजनेत घेण्यास भाग पाडले. या तारण योजनेत ७० टक्के रक्कम हमी भावानुसार त्याचवेळी देण्यात आली होती. गतवर्षी पासून हमीभावानुसार राहिलेली रक्कम ३० टक्के मिळावी म्हणून शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट व भगवानराव काशीद यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पाठपुरावा करत होते. मात्र बाजार समितीकडून टाळाटाळ केली जात होती.

शेतकऱ्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर या देवठाणा व चिखली येथील २२ शेतकऱ्यांना त्यांचे ७० क्विंटल मुगाची ३० टक्के राहिलेली रक्कम हमी भावा ७ हजार १९६ रुपयाप्रमाणे अदा केली. बाजार समितीचे सभापती सुनील शिनगारे, उपसभापती महादेव तोंडे, सहायक निबंधक शिवराज नेहरकर, शेतकरी संघटनेचे कालिदासराव आपेट, भगवानराव काशीद व बाजार समितीचे सचिव दत्ता सोंळके यांच्या उपस्थितीत या शेतकऱ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. राज्यात शेती धान्य तारण योजनेत हमीभावाने पूर्ण रक्कम देणारी धारूर बाजार समिती एकमेव बाजार समिती ठरली असून, हमीभावाने पूर्ण रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

160921\img-20210916-wa0113.jpg

एक वर्षा पुर्वी मुग तारणचे तिस टक्के रकमेचे राहीलेले हमीभावाचे धनादेश देताना