शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे अंबाजोगाईकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:32 IST

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून सतत होणा‌ऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे अंबाजोगाईकर त्रस्त झाले आहेत. विद्युत वाहिन्यांतील ...

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून सतत होणा‌ऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे अंबाजोगाईकर त्रस्त झाले आहेत. विद्युत वाहिन्यांतील झालेल्या बिघाडाचे कारण पुढे दाखवत तासन्‌तास विद्युत पुरवठा ठप्प होत आहे. परिणामी छोटे व्यावसायिक संकटात सापडले आहेत.

अंबाजोगाई शहरात महावितरणच्या वसुलीचे प्रमाण चोख असल्याने शहराला भारनियमनातून मुक्त ठेवले आहे. मात्र, ग्रामीण भागात भारनियमन आठ ते दहा तास कायम आहे. तरीही बिघाडाच्या नावाखाली भारनियमन व्यतिरिक्त ही तासन्तास वीजपुरवठा ठप्प राहत असल्याने छोटे व्यावसायिक संकटात सापडले आहेत. मध्यंतरी झालेल्या वादळी पावसाने शहर व परिसरात अनेक विद्युत वाहिन्या निकामी झाल्या होत्या. या वाहिन्या आता दुरूस्ती झाल्या तरीही बिघाडाचे कारण पुढे करून दोन ते तीन तास वीजपुरवठा बंद ठेवला जातो. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स दुकानदार, रसवंतीगृह, संगणकाची दुकाने व छोटे व्यावसायिक यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. वीज वसुलीच्या नावाखाली न पैसे भरलेल्या ग्राहकांची वीज कनेक्शन बंद करण्यासाठी जनित्रावरून वीजपुरवठा ठप्प केला जातो. याचा फटका पैसे भरणाऱ्या ग्राहकांना निमुटपणे सहन करावा लागतो. वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा महावितरणच्या विरोधात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेनेचे तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे यांनी दिला आहे.

वाहिन्यांत बिघाड, दुरुस्ती सुरू

महावितरणचे सहाय्यक अभियंता संजय देशपांडे यांच्याकडे या संदर्भात विचारणा केली असता वाहिन्यांच्या बिघाडाच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे. दुरुस्ती झाल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत होईल, असे ते म्हणाले.

---------