शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत वेश्या व्यवसायाचा लॉजमध्येच अड्डा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 00:56 IST

अंबाजोगाईत मागील काही दिवसांपासून वेश्या व्यवसाय तेजीत सुरू असल्याचे समोर येत आहे. दीड महिन्यापूर्वीच एका लॉजवर पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांसह तीन ग्राहकांना ताब्यात घेतले होते.

ठळक मुद्देदोन महिलांसह ग्राहक, मालक, चालक जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कबीड/अंबाजोगाई : अंबाजोगाईत मागील काही दिवसांपासून वेश्या व्यवसाय तेजीत सुरू असल्याचे समोर येत आहे. दीड महिन्यापूर्वीच एका लॉजवर पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांसह तीन ग्राहकांना ताब्यात घेतले होते. मंगळवारी पुन्हा प्रशांत नगर भागातील एका लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. यामध्ये लॉज मालक, चालक, ग्राहक व दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष व अंबाजोगाई शहर पोलिसांनी केली.अंबाजोगाई शहरातील बसस्थानकासमोरच १० आॅक्टोबर रोजी एका लॉजवर छापा टाकण्यात आला होता. यामध्ये दोन महिलांची सुटका करून तीन ग्राहकांना ताब्यात घेतले होते.या कारवाईने शहरात खळबळ उडाली होती. परंतु पुन्हा याच परिसरात बसस्थानकाच्या पाठिमागे ‘जनता’साठी असलेल्या लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला समजली. त्यांनी याबाबत खात्री केली. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना ही माहिती देऊन कारवाईसाठी सापळा रचला होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विशाल आनंद, पोलीस उपनिरीक्षक दीपाली गित्ते, भारत माने, देवकन्या मैंदाड (अंबाजोगाई शहर), निलावती खटाणे, शेख शमिम पाशा, विकास नेवडे यांनी केली.डमी ग्राहक पाठवून कारवाईमंगळवारी सकाळी पोलीस उपअधीक्षक विशाल आनंद यांनी एक डमी ग्राहक लॉजवर पाठविला. त्याला योग्य त्या सूचना देण्यात आल्या होत्या. दुपारी डमी ग्राहकाकडून पोलिसांना खात्री पटताच त्यांनी लॉजवर छापा टाकला. यामध्ये एक ग्राहक व दोन महिला आढळून आल्या. तसेच लॉज मालक नारायण व्यंकटराव गुडे (६५) व लॉज मॅनेजर सचिन जगन्नाथ दुधाने (३०) या दोघांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून रोख रक्कम व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक दीपाली गित्ते यांच्या फिर्यादीवरून मालक गुडे व मॅनेजर दुधाने व एका ग्राहकाविरूद्ध अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.दुकानातून ठेवली नजर‘जनता’साठी असलेल्या या लॉजच्या बाहेरील एका दुकानात पोलीस दबा धरून बसलेले होते. डमी ग्राहकाकडून खात्री पटताच सर्वांनीच लॉजवर छापा टाकून महिलांची सुटका करीत ग्राहक व लॉज मालक, चालक यांना जेरबंद केले. या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शहरातील बसस्थानकाच्या परिसरातील लॉजवर असे प्रकार राजरोस चालत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर सापळा रचून टाकला छापा.