शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाई, परळी दूध संघाचे २ कोटी रुपये थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:37 IST

बीड जिल्ह्यात आष्टी, कडा, पाटोदा, गेवराई, बीड तालुका व जिल्हा दूध संघ अस्तित्वात आहेत. या संघांनी स्वतःचा प्रकल्प उभा ...

बीड जिल्ह्यात आष्टी, कडा, पाटोदा, गेवराई, बीड तालुका व जिल्हा दूध संघ अस्तित्वात आहेत. या संघांनी स्वतःचा प्रकल्प उभा केला आहे. जिल्ह्यात केवळ परळी तालुका दूध संघ व अंबाजोगाईच्या वसुंधरा महिला तालुका दूध संघ राज्य शासनाला दूध पुरवठा करते. १ डिसेंबरपासून जवळपास दोन कोटी रुपयांची बिले शासनाकडे थकली आहेत. ही बिले वेळेत न मिळाल्यामुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसह दूध संघचालक अडचणीत सापडले आहेत. वसुंधरा महिला तालुका दूध संघाचे १ कोटी ५० लाख रुपये आणि परळी दूध संघाचे ७० लाख रुपये शासनाकडे थकले आहेत.

ही थकीत रक्कम तत्काळ देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.

चौकट,

खासगीप्रमाणेच शासकीयला दर हवा

राज्य शासनाने दुधाचे भाव वाढवावेत,

खासगी दूध संघचालक लिटरला २८ रुपये भाव देत आहेत. मात्र, शासकीय दूध संघांना २५ रुपये भाव मिळत आहे. खासगी आणि शासन यांच्या दरात फरक असून वाढीव दर देणाऱ्या संघाकडेच दूध देण्याचा शेतकऱ्यांचा कल आहे. पशुखाद्यासह चाऱ्याचे भाव गगनाला भिडलेत. त्यामुळे शासनाने खासगी दूध संघाच्या दराप्रमाणेच शासकीय दूध संघालाही भाव द्यावा, तातडीने याची दखल शासनाने घ्यावी, अशी मागणी वसुंधरा महिला तालुका दूध संघ वसुंधरा महिला तालुका दूध संघाचे कार्यकारी संचालक सुधाकर आगळे यांनी केली.

कोट,

थकीत बिलासंदर्भात पाठपुरावा सुरू

१ डिसेंबरपासून शासनाकडे थकीत बिलाच्या निधीसाठी दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन बिलासंदर्भात चर्चा झालेली आहे. त्यांनी बिले लवकर देण्याचे आश्‍वासन दिले असून यासंदर्भात आपण स्वतःहून पाठपुरावा करत आहोत.

- नमिता मुंदडा, आमदार.