शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उद्घाटनाला वर्ष उलटले तरी कडा बसस्थानकाच्या कामाला मुहूर्त लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:32 IST

फोटो- याच जागेवर होणार नवीन बसस्थानक कडा : उद्घाटनाला वर्ष उलटले तरी जागेच्या वादामुळे कडा बसस्थानकाच्या कामाला मुहूर्त लागत ...

फोटो- याच जागेवर होणार नवीन बसस्थानक

कडा : उद्घाटनाला वर्ष उलटले तरी जागेच्या वादामुळे कडा बसस्थानकाच्या कामाला मुहूर्त लागत नसल्याने महिला, मुली व प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर कुचबंणा होत आहे. मराठवाड्याचे प्रवेशद्वार व दिवसभरात दोनशेहून अधिक बसेसची ये - जा असलेल्या कडा बसस्थानकाला उतरती कळा आली होती आणि सोयीसुविधा नसल्याने नवीन बसस्थानक व्हावे, अशी जनतेची मागणी होती. हा प्रश्न मार्गी लागला, मंजुरी मिळाली, उद्घाटनही झाले, एक कोटी चाळीस लाख रुपये खर्चाला कार्यारंभ आदेश मिळाला. जागेचे मार्कआऊट केले. पण नेमकी जागा ग्रामपंचायती की, राज्य मार्ग परिवहन महामंडळाची, हा वाद मिटत नसल्याने वर्ष उलटून गेले तरी कामाला मुहूर्त अद्याप लागलेला नाही.

आष्टी तालुक्यातील कडा येथे बीड नगर राष्ट्रीय महामार्गावर बसस्थानक आहे. अनेक वर्षांपासून बसस्थानक असल्याने आता ती जागा अपुरी पडत असून, सोयीसुविधा मिळत नसल्याने जनतेच्या रेट्यामुळे सन २०१८मध्ये नवीन बसस्थानक मंजूर झाले. २०१९ला उद्घाटन झाले. पण, तेव्हापासून ग्रामपंचायत व एस. टी. महामंडळात जागा कोणाची, असा वाद सुरू झाला. ग्रामपंचायत व महामंडळ दोघेही आमचीच जागा असल्याचा दावा करत असल्याने ती जागा नेमकं कोणाची, हे अजूनही समजले नाही. त्यामुळे जवळपास दीड कोटी रुपये खर्चून शहरांच्या वैभवात भर घालणाऱ्या या नियोजित बसस्थानकाच्या कामाला आडकाठी निर्माण झाली आहे. सध्या या ठिकाणी कसलीच सोय नाही. प्रवाशांना उघड्यावरच नैसर्गिक विधीसाठी बसावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत आहे.

शहराच्या वैभवात भर पडत असेल तर लवकरात लवकर जागेचा वाद मिटवून बसस्थानकाच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी शिवसंग्राम तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.

याबाबत आष्टी येथील आगारप्रमुख संतोष डोके यांना विचारणा केली असता कडा बसस्थानकाच्या जागेचा वाद सुरू असल्याने बसस्थानकाचे काम बंद असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. जागेच्या वादाचा विषयच येत नाही. महामंडळाने त्यांना ठरवून दिलेल्या ६१ गुंठे जागेत बसस्थानकाचे काम सुरू करावे, असे कडा येथील ग्रामविकास अधिकारी आबासाहेब खिलारे म्हणाले.