संजय खाकरे
परळी : एसटीच्या रातराणी बस परळीहून पुणे, मुंबई, नागपूरला भरून जात आहेत. परळीमार्गे पुणे ट्रॅव्हल्सला स्लीपरकोचची सोय असल्याने ट्रॅव्हल्सला उदंड प्रतिसाद मिळत आहे. येथून २५च्या जवळपास परळी-पुणे ट्रॅव्हल्स गाड्या सुटतात. तसेच मुंबई, नागपूर, कोल्हापूर येथे जाण्यासाठीही ट्रॅव्हल्सची सोय आहे.
एसटी महामंडळाच्या बसेसपेक्षा ट्रॅव्हल्स गाड्यांना तिकीट जास्त असतानाही केवळ आरामदायी व झोपून जाण्याची सुविधा असल्याने ट्रॅव्हल्सला प्रवाशांची गर्दी असते. लॉकडाऊनच्या काळातही परळी-पुणे ट्रॅव्हल्स चालू होत्या. नांदेड-पनवेल, अमरावती-पुणे रेल्वे सेवा बंद असल्याने रेल्वेने पुण्याला प्रवास करता येत नाही. त्यामुळे प्रवासी एसटी बस व ट्रॅव्हल्स गाड्यास पसंती देत आहेत.
एसटी महामंडळाच्या वतीने परळी आगारातून एकूण ७३ बसफेऱ्या चालू आहेत. त्यापैकी बीड जिल्ह्यात ५६ बसफेऱ्या चालू असून गेल्या आठ दिवसांत एसटी महामंडळाच्या परळी बस आगाराचे उत्पन्न वाढले आहे. परळी बसस्थानकातून नागपूर, बोरावली, मुंबई, पुणे, नाशिक येथे रातराणी बस सुरू करण्यात आल्या आहेत. ट्रॅव्हल्स गाड्यांपेक्षा बसला तिकीट कमी असल्याने व प्रवास सुरक्षिततेचा असल्याने एसटी महामंडळाच्या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पुणे बस भरून जात आहेत. एसटीच्या रातराणी बोरीवली गाडीस ९१५ रुपये तिकीट आहे तर लातूर-नागपूरला ९४५ रुपये, मुंबईला ७७० रुपये तर परळी-नागपूरला रातराणी बसला ५९५ तिकीट आहे, पुणे बसला ५४५ रुपये तिकीट आहे.
बसपेक्षा ट्रॅव्हल्सला तिकीट जास्त आहे. परळीहून पुणे ट्रॅव्हल्सला ९०० रुपये तिकीट आहे. नागपूरला १२५० रुपये, मुंबई १२५० रुपये, बोरावलीला १३०० रुपये असे भाडे आहे.
एसटी महामंडळाच्या बसचे चालक सामाजिक बांधिलकी व भान ठेवून ड्युटी करत असल्याने प्रवाशांचा एसटी बससेवेवर प्रचंड विश्वास आहे. तसेच प्रवाशांसाठी अपघात साहाय्यता निधीची सुविधा आहे व सगळीकडे बस आगार असल्याने एसटी बससेवेला कुठलीही अडचण येत नाही
- प्रवीण भोंडवे, बसआगार प्रमुख, परळी
परळीहून पुणे येथे जाण्यासाठी ट्रॅव्हल्स गाड्यास स्लीपर कोचची सुविधा आहे. त्यामुळे प्रवाशांना झोपून आरामशीर प्रवास करता येतो व एका ट्रॅव्हल्समध्ये ३० प्रवासी नेतात. त्यामुळे ट्रॅव्हल्सला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे.
- कमलकिशोर सारडा, ट्रॅव्हल्स चालक, परळी
बीड जिल्ह्यात ५६ फेऱ्या, वाहक ४५, चालक ४५, रातराणी ८ फेऱ्या, वाहक १८,चालक १८
===Photopath===
160621\16_2_bed_21_16062021_14.jpg~160621\16_2_bed_22_16062021_14.jpg
===Caption===
परळी बस~परळी बस