शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

एड्स घातकच ; बीड जिल्ह्यात ३७७ गरोदर माता, ९६८४ नागरिकांना लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 12:10 IST

जिल्ह्यात अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात २००६ व बीडमध्ये २००९ मध्ये एआरटी (अँटी रेट्रो व्हायरल थेरपी) सेंटर सुरू करण्यात आले.

ठळक मुद्दे२००९-१० साली जिल्ह्यातील बाधितांचा टक्का ५.५ एवढा होता. तो आता ०.४२ वर आला आहे. गतवर्षी तोच ०.३८ एवढा होता.

बीड : जिल्ह्यात एचआयव्ही बाधित रुग्णांची संख्या शून्यावर आणण्यात अपयश आल्याचे दिसत आहे. मागील दहा वर्षांचा आढावा घेतला असता तब्बल ३७७ गरोदर माता आणि ९ हजार ६८४ सामान्य नागरिकांना याची लागण झाल्याचे समाेर आले आहे. ५.५ वरून टक्का ०.४२ वर आला असला तरी त्याने अद्यापही शून्य गाठलेला नाही. तो कमी करण्यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध विभागाकडून उपचार अन् समुपदेशन केले जात आहे. 

जिल्ह्यात अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात २००६ व बीडमध्ये २००९ मध्ये एआरटी (अँटी रेट्रो व्हायरल थेरपी) सेंटर सुरू करण्यात आले. येथे रुग्णांची तपासणी करून उपचार केले जातात. रुग्ण बाधित आढळताच त्याला ‘डापकू’ विभागाकडे पाठविले जाते. येथे तिचे सुरुवातीला समुपदेशन करून आधार दिला जातो. त्यानंतर तात्काळ उपचार सुरू केले जातात. तसेच वारंवार पाठपुरावा करून उपचारही केले जातात. बाधित आढळल्यापासून १८ महिन्यापर्यंत चारवेळा तपासणी केली जाते. शेवटची तपासणी निगेटिव्ह आल्यास त्याला सोडूून देण्यात येते.

यावर्षी टक्का वाढला२००९-१० साली जिल्ह्यातील बाधितांचा टक्का ५.५ एवढा होता. तो आता ०.४२ वर आला आहे. गतवर्षी तोच ०.३८ एवढा होता. तसेच गरोदर मातांचाही टक्का सध्या ०.०२ एवढा आहे. गतवर्षी ०.०३ तर २०१८ साली तोच ०.०२ एवढा होता. मागील दहा वर्षांत ९६८४ लोकांना एचआयव्हीची बाधा झाल्याचे उघड झालेले आहे. पूर्वीपेक्षा टक्का कमी होत आहे. रुग्ण बाधित आढळताच वारंवार पाठपुरावा करून औषधोपचार केले जातात.         - साधना गंगावणे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बीड

एआरटी सेंटरनुसार रुग्णांचे वर्गीकरणएआरटी सेंटरचे नाव    एकूण     इतरत्र    सध्याची    मृत्यू    नोंदणी    पाठवले    नोंदणी    संख्याबीड (सप्टेंबर २०१२ पासून)    ५३०४    ४७९    ४८२५    १००२अंबाजोगाई (सप्टेंबर २००६ पासून)    ११९०६    ४५८०    ७३२६    २५३१

वर्षनिहाय आकडेवारीकालावधी    तपासणी    बाधित२००९-२०१०    ३२९६५    १८१४२०१०-२०११    ३१५३५    १४५१२०११-२०१२    ३५३४९    ११४५२०१२-२०१३    ४३९९७    ९६९२०१३-२०१४    ४६४६१    ९०३२०१४-२०१५    ४८१३४    ७४८२०१५-२०१६    ७१५१८    ६८३२०१६-२०१७    ६२४७१    ५६९२०१७-२०१८    ६७६३१    ४८२२०१८-२०१९    ७४१५९    ३८३२०१९-२०२०    १०७४१२    ४१३२०२०- ऑक्टोबर २०२०    २९३९१    १२४

टॅग्स :BeedबीडHIV-AIDSएड्स