शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निकालानंतर आर्वीत हाणामा-या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरुर कासार : तालुक्यात दुस-या टप्प्यात झालेल्या २० ग्रामपंचायत निवडणुकीत आर्वीचाही समावेश होता. मंगळवारी मतदान व ...

ठळक मुद्देपरस्परांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कशिरुर कासार : तालुक्यात दुस-या टप्प्यात झालेल्या २० ग्रामपंचायत निवडणुकीत आर्वीचाही समावेश होता. मंगळवारी मतदान व बुधवारी मतमोजणी व निकाल जाहीर झाल्यानंतर आर्वीत त्याचे पडसाद उमटले. दोन गटांत वाद झाले. दोन्ही गटातील २१ आरोपीतांस पोलिसांनी अटक केली आहे. गावात सध्या शांतता असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी दिली.

निर्मला रावसाहेब जोगदंड यांनी दिलेल्या फिर्यादीत तुम्ही आम्हाला ग्रा.पं. निवडणुकीत मतदान का केले नाही, तुमची आमच्या विरोधात पॅनल टाकण्याची काय गरज होती? असे म्हणून जातीवाचक भाषेत शिवीगाळ करीत दगडफेक केली. यावरूनी ६० जणांविरूद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला.

तर जयश्री लक्ष्मण जोगदंड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, माझी मुलगी सुकेशिनी लक्ष्मण जोगदंड ही अरुण भोसले यांचे पॅनलमध्ये ग्रा.पं.सदस्यपदासाठी उभी होती. मतमोजणी झाल्यानंतर ती पराभूत झाली. आम्ही सर्व आमचे घरी होतो. बुधवारी दुपारी २.३० सुमारास आम्हाला नेण्यासाठी भोसलेवस्तीवर जीप आली होती. यावेळी तेथे आमचे भावकीतील १३ जणांनी संगनमत करुन सदर गाडीवर दगलफेक करून मारहाण केली.सोडवायला गेल्यावर ‘आमच्या विरोधात निवडणूक लढवली म्हणून आम्ही पराभूत झालो’ असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. यावरून दोन्ही गटांनी परस्परांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. घटनास्थळाला पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी भेट दिली.

पोलिसांचा बंदोबस्तआर्वीतील वाद समजताच उप विभागीय पोलीस अधिकारी अभिजित पाटील, शिरुर ठाण्याचे पो. नि. सुरेश चाटे हे फौजफाट्यासह आर्वीत दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होते. त्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.