शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर छावण्या तपासणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:32 IST

दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना पुरेसे खाद्य व पणी मिळावे यासाठी बीड जिल्ह्यात मोठ्या जवळपास ९०० छावण्यांना मंजुरी देण्यात आली होती.

ठळक मुद्देतहसील प्रशासन सतर्क : मंजुरीनंतर देखील सुरू न झालेल्या २६८ पेक्षा अधिक चारा छावण्या केल्या बंद

बीड : दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना पुरेसे खाद्य व पणी मिळावे यासाठी बीड जिल्ह्यात मोठ्या जवळपास ९०० छावण्यांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र, मंजुरी मिळून देखील सुरू न केल्यामुळे कार्यवाही करत २६८ छावण्या बंद करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी चारा छावण्यांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी नेमलेली पथके सतर्क झाली असून, तपासणीला वेग आला आहे.चारा छावण्यांची संख्या वाढल्यामुळे यापूर्वी झाला तसा मोठा गैरप्रकार होईल, अशी चर्चा नागरिकांमधून होत होती. मात्र छावण्यांच्या तपासणीसाठी जिल्हास्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आल्यामुळे गैरप्रकारास आळा बसणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सक्त आदेशानंतर चारा छावणीसंदर्भात तहसील प्रशासन देखील खडबडून कामाला लागले आहे. याच कारणामुळे मंजुरी दिलेल्या छावण्या सुरु न करण्यात आल्यामुळे जवळपास २६८ चारा छावण्या बंद केल्या आहेत. तसेच कार्यरत नसलेल्या छावण्या बंद करण्याचे प्रस्ताव तहसील स्तरावर प्रलंबित असल्याची माहिती आहे. पुढील आठवड्यात सुरु न केलेल्या आणखी १५० छावण्या बंद होण्याची शक्यता आहे.ज्या छावण्यांध्ये जनावरांची संख्या ३०० पेक्षा कमी आहे अशा छावण्या देखील बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सुरु असलेल्या जनावरांची संख्या योग्य प्रकारे तपासूनच अहवाल देण्याचे देखील जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. छावणीमधील जनावरांची संख्या दिलेल्या आठवडी अहवालापेक्षा कमी असल्याचे भरारी पथकाला आढळून आले तर संबंधित तलाठी, ग्रामसेवक व अधिकारी यांच्यासह छावणी चालकावर कायदेशीर तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.जनावराला लावणार बारकोडछावणीमध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी जनावरांची संख्या अधिक दाखणे हा पर्याय असतो. याला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व छावण्यांवरील जनावरांना डिजिटल बारकोड लावण्यात येणार असून, त्याचे थेट प्रक्षेपण हे जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. त्यामुळे ज्यावेळी शंका येईल त्यावेळी त्या ठिकाणी असलेली जनावरे तपासता येणार आहेत. ही प्रणाली पुढील आठवड्यापासून अंमलात आणण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे.

टॅग्स :Beedबीडcollectorजिल्हाधिकारीagricultureशेती