शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या गलथान कारभाराने केजमध्ये भरला बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST

केज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक नियम लागू केले असताना केज येथील प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे केज शहरातील मंगळवार ...

केज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक नियम लागू केले असताना केज येथील प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे केज शहरातील मंगळवार पेठेत सकाळीच बाजार भरल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. मात्र दुपारी बाराच्या सुमारास नगर पंचायतीच्या काही कर्मचाऱ्यांनी बाजार उठविण्यास सुरुवात केली. मात्र भरलेला आठवडी बाजार उठविताना कर्मचाऱ्याच्या नाकी नऊ आल्याचे चित्र दिसून आले.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात व जिल्ह्यात कडक नियमावली लागू करण्यात आली असली तरी या कडक नियमावलीची अमलबजावणी केज येथील प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी करीत नसल्याने केज शहरातील मंगळावर पेठेत मंगळवारी सकाळीच मंगळवारचा आठवडी बाजार भरला होता. बाजारात भाजीपाला, किरकोळ विक्रेते यांसह अन्य विक्रेत्यांनी आपापली दुकाने थाटली होती; तर तालुक्यातील आसपासच्या गावांतील नागरिकांनी बाजार करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

सकाळी बाजार भरत असताना केज येथील प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी झोपलेले होते. मात्र बाजार गर्दीने फुलू लागताच त्यांना जाग आल्याने केज नगर पंचायतीचे काही कर्मचारी, दोन होमगार्ड व एक पोलीस कर्मचारी यांनी भरलेला बाजार उठविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र बाजारात ठाण मांडून बसलेल्या विक्रेत्यांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. बाजार बंद करायचा होता तर शुक्रवारच्या बाजारात आम्हाला माहिती का दिली नाही, असा सवाल ते करीत होते. विक्रेते बाजारातून उठत नसल्याने काही ठिकाणी नगर पंचायत कर्मचारी व होमगार्ड व पोलिसांनी भाजीपाला उचलून घेत बाजार बंद करण्याचा प्रयत्न केला असल्याचे चित्र दिसून आले.

कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासह येणाऱ्या तिसऱ्या लाटेत नागरिकांना संसर्ग होऊ नये यासाठी शासन व प्रशासन कडक नियम लागू करीत असताना या नियमांची अंमलबजावणी मात्र केज शहरात प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी करीत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

===Photopath===

290621\img_20210629_103753.jpg

===Caption===

केज शहरातील मंगळवार पेठेत भरलेला आठवडी बाजार उठवताना नगर पंचायतचे कर्मचारी.