शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांना अ‍ॅडजस्टमेंट अंगलट; ‘सीईओं’नी मागविला अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:30 IST

प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णलयातील वैद्यकीय अधिकारी अ‍ॅडजस्टमेंट करून उपचारात हलगर्जी करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ही बाब ‘लोकमत’ने निदर्शनास आणून देताच मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी गंभीर दखल घेतली.

ठळक मुद्देस्वत: घेणार हजेरी : हलगर्जी केल्याचे दिसताच तात्काळ होणार कारवाई

बीड : प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णलयातील वैद्यकीय अधिकारी अ‍ॅडजस्टमेंट करून उपचारात हलगर्जी करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ही बाब ‘लोकमत’ने निदर्शनास आणून देताच मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी गंभीर दखल घेतली. जे डॉक्टर, कर्मचारी नियमित आरोग्य संस्थेत जाणार नाहीत किंवा अ‍ॅडजस्टमेंट करतील, त्यांच्यावर तात्काळ कारवाईचा इशारा दिल.जिल्ह्यात ५१ प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालये ३, ग्रामीण रुग्णालये १०, स्त्री रुग्णालय १ आणि जिल्हा रुग्णालय १ अशा आरोग्य संस्था आहेत. मात्र, येथील वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी हे मुख्यालयी राहून सेवा देत नाहीत. तसेच दोन पैकी एकच अधिकारी नियमित आरोग्य संस्थेत जातात. याचा फटका सामान्य रुग्णांना सहन करावा लागत होता. दरम्यान, हा प्रकार ‘लोकमत’ने यापूर्वीही वृत्त प्रकाशित करून निदर्शनास आणला होता. त्यावेळी सीईओ अजित कुंभार यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांना तात्काळ आदेश देत सर्वांची हजेरी घेण्यासह हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. तसेच अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना वैद्यकीय अधिकाºयांची नियमित हजेरी घेऊन एका गु्रपवर टाकण्यास सांगितले होते. सुरूवातीचे काही दिवसच त्यांनी हा आदेश पाळला. त्यानंतर या आदेशाला केराची टोपली दाखविली. त्यामुळे आरोग्य सेवा बिघडली आणि परिस्थिती जैसे थे झाली होती. त्यामुळे ‘लोकमत’ने २६ जानेवारी रोजी ‘ग्रामीण आरोग्य बिघडले; सीईओंच्या आदेशाकडे दुर्लक्ष’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून हा प्रकार निदर्शनास आणला. पुन्हा सीईओ कुंभार यांनी गंभीर दखल घेत हलगर्जीपणा करणाºयांवर कारवाईचा इशारा दिला, त्यामुळे डॉक्टर, कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहेत.मुख्यालयी राहण्याची अ‍ॅलर्जी का ?डॉक्टर, कर्मचाºयांनी मुख्यालयी राहुन सेवा देणे बंधनकारक आहे. मात्र, बोटावर मोजण्याइतकेच वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहतात. सीईओंनी आदेश दिल्यावर केवळ नोटीस देऊन पाहुणचार केला जातो. माहिती असतानाही कारवाई करण्यास आखडता हात घेतला जातो. हा सर्व प्रकार संशयास्पद आहे.निवासस्थान नसल्यावर घरभाडे भत्ता मिळतो. मात्र, असे कोणीच करीत नाही. डॉक्टरांना अ‍ॅडजेस्टमेंट आणि हलगर्जीपणा करण्याची सवय झाल्याने मुख्यालयी कोणीच राहत नसल्याचे सूत्रांकडून समजते.म्हणे, वरिष्ठांच्या आदेशाला हो म्हणून सोडून द्यायचे....नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असताना डॉक्टर, कर्मचारी सेवेकडे दुर्लक्ष करतात. याबाबत वरिष्ठांनी आदेश दिल्यावर काही तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक ‘वरिष्ठ बोलतच असतात, त्यांचे एवढे मनावर घेत नसतात, हो म्हणून सोडून द्यायचे असते’ असे म्हणत आदेशाला केराची टोपली दाखविली जाते. आता यावेळेस काय होते? हे वेळच ठरविणार आहे.

टॅग्स :Beedबीडhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर