शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा क्रीडा संकुलात मिळणार वाढीव सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 00:08 IST

जिल्हा क्रीडा संकुलात अंतर्गत सुविधांसाठी करण्यात येणाऱ्या विविध कामांना जिल्ह क्रीडा संकुल समितीने मंजुरी दिली आहे. याचा खेळाडू व क्रीडाप्रेमींना लाभ मिळणार आहे. या कामांसाठी ४ कोटी १८ लाख रूपयांचा निधी प्रस्तावित आहे.

ठळक मुद्देचार कोटींचा निधी : बीड जिल्हा क्रीडा संकुल समितीची मंजुरी; दर्जेदार कामाची अपेक्षा

बीड : जिल्हा क्रीडा संकुलात अंतर्गत सुविधांसाठी करण्यात येणाऱ्या विविध कामांना जिल्ह क्रीडा संकुल समितीने मंजुरी दिली आहे. याचा खेळाडू व क्रीडाप्रेमींना लाभ मिळणार आहे. या कामांसाठी ४ कोटी १८ लाख रूपयांचा निधी प्रस्तावित आहे.जिल्हा क्रीडा संकुलात सध्या विकासाच्या दृष्टीने अनेक कामे हाती घेतले जात आहेत. नुकतीच स्वच्छता व रंगरंगोटी आणि भिंतीवरील चित्रांमुळे संकुल आकर्षक झाले आहे. आता याच संकुलात धावणे मार्ग, वसतिगृह, जॉगिंग, पार्किंग आदी विकास कामांबाबत दोन महिन्यांपूर्वी आराखडा तयार करून जिल्हा क्रीडा कार्यालयाने संकुल समितीसमोर मांडला होता. ४ कोटी १८ लाख ४ हजार १९७ रूपयांचा अंदाजित निधी या कामांसाठी होता. याच कामांना आणि निधीला समितीने मंजुरी दिली आहे.दरम्यान, नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच त्यांना हा सर्व प्रस्ताव दाखविल्यावर बांधकाम विभाग यावर कार्यवाही करणार आहे. तांत्रिक मान्यता मिळताच टेंडर काढून कामांना सुरूवात केली जाणार आहे. ही सर्व कामे झाल्यावर खेळाडू व क्रीडा प्रेमींना मोठा फायदा होणार आहे. ही कामे दर्जेदार व लवकर पूर्ण करावीत, अशी अपेक्षा बीडकरांना आहे.असे आहेत कामे आणि निधी (रूपयांमध्ये)४०० मिटर धावण मार्ग, हॉकी, फुटबॉल मैदान अद्यावत करणे - ८०८७०७३४०० मीटर धावणे मार्गाच्या आतील व बाहेरील बाजूने नाली बांधकाम करणे - ६०१०७७७खेळाडू वसतिगृहातील ३ रा मजला बांधकाम करणे - ९८६६३४७संकुलामध्ये विविध मैदानांवर पाण्याची सुविधा पुरविणे - ६४००००चालण्यासाठी ट्रॅक बनविणे - ७३०००००संकुलात पार्किग एरिया विकसित करणे -६४०००००पार्किंग एरियाला कंपाऊंड वॉल व ग्रील वर्क करणे - ३५०००००

टॅग्स :Beedबीड