शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विशाल कुलथे खून प्रकरणातील आरोपींना फाशी व्हायला हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : शहरातील सराफा व्यापारी विशाल कुलथे खून प्रकरणातील चारही आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर कासार : शहरातील सराफा व्यापारी विशाल कुलथे खून प्रकरणातील चारही आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी भाजपा प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी सरकारकडे केली आहे. याप्रकरणी विशाल कुलथेच्या कुटुंबीयांनी चित्रा वाघ यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदनाद्वारे व्यथा मांडली.

सराफा व्यापारी विशाल कुलथे यांची हत्या अमानूषपणे करण्यात आली आहे. ही घटना पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासाला न शोभणारी आहे. सहा महिन्यांपूर्वीच विशाल यांचे लग्न झाले असून, संपूर्ण परिवाराची जबाबदारी त्यांच्यावर होती. घरातील कर्ता व्यक्तीच गेल्यामुळे परिवारावर फार मोठे संकट ओढावलेले आहे. त्यामुळे हा परिवार न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. या प्रकरणात सहभागी असलेला आरोपी भैया गायकवाड आणि त्याचे वडील यांच्यासह केतन लोमटे, धीरज मांडकर यांना फाशीची शिक्षा व्हावी. या प्रकरणात ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ तथा विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची सरकारने नियुक्ती करून विशाल कुलथे परिवाराला न्याय द्यावा, अशा प्रकारची मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचे वाघ यांनी सांगितले.

....

मराठवाड्यात मुली बेपत्ता होण्याच्या घटनांत वाढ

बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात गुन्हेगारी वाढली आहे. महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांत वाढ झालेली आहे. शिवाय अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे प्रकार घडत असून,० त्यांचा शोधदेखील लागत नाही. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला ही चिंतेची आणि शरमेने मान खाली घालायला लावणारी बाब आहे. सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे यावेळी चित्रा वाघ यांनी सांगितले.

...

===Photopath===

300621\img-20210630-wa0006.jpg

===Caption===

चित्रा वाघ यांची भेट