शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये गर्भपिशव्या काढणारे रॅकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 06:29 IST

आरोग्य विभागामार्फत चौकशी सुरू : १० रुग्णालयांमध्ये केल्या दीड हजार शस्त्रक्रिया

बीड : जिल्ह्यात महिलांना विविध आजारांची भिती दाखवून गर्भ पिशव्या काढून टाकण्याचा बाजार मांडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोग्य विभागाच्या समितीने याची चौकशी केली असता येथील १० रूग्णालयांमध्ये दीड हजारापेक्षा जास्त शस्त्रक्रिया झाल्याची माहिती उघडकीस आली आहे.

गरज नसतानाही कमी वयांच्या महिलांची गर्भ पिशवी काढून टाकण्यात येत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. राज्याच्या आरोग्य विभागालाही चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांना आदेश देत तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले. त्याप्रमाणे डॉ. आय. व्ही. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. संतोष शहाणे, डॉ. अशोक हुबेकर, डॉ. महेश माने व लिपीक विकास शिंदे ही पाच सदस्यीय समिती नियूक्त केली आहे.

दरम्यान, बुधवारीच जिल्ह्यातील सर्व रूग्णालयांना पत्र पाठवून केलेल्या शस्त्रक्रियांचा अहवाल डॉ. थोरात यांनी मागविला. गुरूवारी या समितीने यावर अभ्यास करून ‘टॉप १०’ रूग्णालये काढली. या रूग्णालयांची सायंकाळच्या सुमारास चौकशी सुरू करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. रात्री ७ वाजेच्या सुमारास डॉ. थोरात, डॉ. शिंदे यांचे पथक सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स परिसरातील एका रूग्णालयात उशिरापर्यंत ठाण मांडून होते. त्यांच्या हाती काय लागले? हे मात्र समजू शकले नाही.जिल्हाधिकारी, आरोग्य विभागाची बैठकजिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी आरोग्य विभागाची बैठक बोलावली आहे. यात आरोग्य विभागाच्या सहसंचालक कार्यालयाचे अधिकारी उपस्थित राहतील. याशिवाय, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्ह्यातील तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षकही उपस्थित राहणार आहेत.जिल्ह्यातील सर्वच रूग्णालयांकडून अहवाल मागविला आहे. याच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती नियूक्त केली आहे. सुरूवातीला प्राप्त अहवालातातून १० रूग्णालयांची चौकशी केली जात आहे. त्यानंतर प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी होईल. यासाठी वेळ लागणार असला, तरी जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही.-डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड