शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये सलग तिस-या दिवशीही एआरटीओ कार्यालय बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:16 IST

अपुरे कर्मचारी व अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाºयांच्या अनास्थेमुळे येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सलग तिसºया दिवशीही बंद होते. परिणामी शासनाच्या वाहन कराच्या रुपाने मिळणारा लाखो रुपयांचा महसूल बुडाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अपुरे कर्मचारी व अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाºयांच्या अनास्थेमुळे येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सलग तिस-या दिवशीही बंद होते. परिणामी शासनाच्या वाहन कराच्या रुपाने मिळणारा लाखो रुपयांचा महसूल बुडाला.

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत असते. सध्या या कार्यालयाचा प्रभारी पदभार जालना येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सलीम शेख यांच्याकडे आहे. परंतु, ते दोन- दोन आठवडे येत नसल्याने कार्यालयाचे प्रशासन कोलमडले आहे. त्यात अपुरे कर्मचारी असल्याने त्यांच्यावर कामांचा ताण तसेच दबाव वाढत आहे.

अधिका-यांच्या अनुपस्थितीमुळे वाहनांची पासिंग होत नसल्याने वाहनधारक वैतागले आहेत. तर ट्रान्सफर, नोंदणी, कर वसुली, कर्जाचा बोजा चढविण्याचे कामकाज पूर्णत: ठप्प आहे. सोमवारी, मंगळवार आणि बुधवारी या कारणांमुळे कार्यालयाचे काम बंद असल्यातच जमा होते. येथील कर्मचाºयांनी औरंगाबाद येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात वरिष्ठांना भेटून कैफियत मांडली. कामे वेळेत होत नसल्याने विचारणा करणाºया नागरिकांकडून प्रश्नांचा भडिमार केला जातो. त्यामुळे जीवाला धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

त्यानंतर मंगळवारी दुपारी प्रभारी अधिकारी शेख बीडला आले. परंतु, अर्धा तास थांबून ते परत गेले. त्यानंतरही कार्यालयाचे कामकाज सुरु होऊ शकले नाही. सहायक वाहन निरीक्षक, मुंडे, आवाड हे दोघेच हजर होते. त्यांच्याकडे लर्निंग लायसनचे काम असते. मंगळवारीही या कार्यालयाचे कामकाज ठप्प होते. परिणामी तीन दिवसात शासनाला एक रुपयाही महसूल मिळाला नाही. ज्या अधिकाºयाकडे पदभार आहे, ते कधीही येत नाही. ते उंटावर बसून शेळ्या राखत आहेत. बीड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करण्याची मागणी भारिप बहुजन पक्षाचे नेते अ‍ॅड. बक्शू अमीर शेख यांची मागणी केली आहे.वारंवार कामकाज बंदबीड येथील उपप्रादेािक परिवहन कार्यालयाला मागील आर्थिक वर्षात ३२ कोटी रुपयांचे उद्दिट्य होते. सुमारे ३४ कोटी रुपयांचा महसून या कार्यालयाने गतवर्षी जमा केला होता. चालू वर्षात वारंवार कामकाज बंदमुळे महसूलचा आलेख घटणार असून जानेवारीच्या पहिल्या सोमवार ते बुधवार या तीन दिवसात सुमारे ३० लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे.