शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सव्वा दोन लाखांचा मावेजा दिला नाही; बीडच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांची कार जप्त

By शिरीष शिंदे | Updated: May 9, 2024 19:30 IST

बीड येथील जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशानुसार कारवाई

बीड : जमीन संपादनाचा वाढीव सव्वा दोन लाख रुपयांचा मावेजा एका व्यक्तीस दिला नाही. या प्रकरणी बीड येथील अपर जिल्हाधिकारी यांची कार जिल्हा न्यायाधीश-५ के. आर. जोगळेकर यांच्या आदेशान्वये जप्त करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ही कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील रामभाऊ उर्फ रामराव देवराव पवळ यांची १९९५ साली जमीन गावठाण वस्तीवाढ योजनेंतर्गत संपादित करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा न्यायालयाने एलएआर क्रमांक १२१६/१९८९ या प्रकरणात २४ जुलै १९९५ रोजी आदेश पारीत करून कलम १८ नुसार वाढीव मावेजा मंजूर करण्यात आला होता. या आदेशाच्या अनुषंगाने १६ एप्रिल १९९६ रोजी धनादेशाद्वारे ४७ हजार ५१० रुपये जिल्हा न्यायालयात जमा करण्यात आले होते. दरम्यान, रामराव पवळ यांना मावेजाची रक्कम प्रति आर ४०० रुपये प्रमाणे मंजूर झाला होता. परंतु मावेजा न मिळाल्यामुळे रामराव पवळ यांच्या वारसाने जिल्हा न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. २ लाख ३५ हजार ९५१ रुपयांचा भरणा करण्याचा आदेश जिल्हा न्यायाधीश-५ के. आर. जोगळेकर यांनी संबंधित विभागास दिला होता. परंतु त्याचा भरणा झाला नसल्याने अपर जिल्हाधिकारी यांची कार जप्त करण्याचा आदेश काढला. त्यानुसार ६ मे रोजी सांयकाळच्या सुमारास अपर जिल्हाधिकाऱ्यांची कार क्रमांक एमएच-२३, बीसी-३१२२ जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अपर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांच्या मोबाइलवर कॉल केला असता त्यांची कॉल घेतला नाही. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधाेळ यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांची कार जप्तीला दुजोरा दिला.

एसडीओंनी मांडले आपले म्हणणेसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्यावतीने जिल्हा न्यायाधीश-५ यांच्यासमोर आपले म्हणणे सादर केले आहे. प्रथम अपिल प्रकरणातील आदेशानुसार वाढीव मावेजाची रक्कम एक महिन्याच्या कालावधीत न्यायालयात भरणा केली जाईल. सध्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची कामे सुरू आहेत. निवडणुकीसाठीची कामे पार पाडण्यासाठी अपर जिल्हाधिकारी यांना शासकीय वाहनाची नितांत आवश्यकता आहे. अपर जिल्हाधिकाऱ्यांचे जप्त करण्यात आलेले वाहन सोडण्यात यावे अशी विनंती न्यायालयास करण्यात आली आहे.

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडCourtन्यायालय