शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

६८ हजार लाभार्थी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:25 IST

पायाभूत सर्वेक्षणात असलेल्या परंतु शौचालय बांधकामे पूर्ण केलेले जिल्ह्यातील ६८ हजार लाभार्थी प्रोत्साहनपर बक्षीस अनुदानाच्या रकमेपासून वंचित राहिले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पायाभूत सर्वेक्षणात असलेल्या परंतु शौचालय बांधकामे पूर्ण केलेले जिल्ह्यातील ६८ हजार लाभार्थी प्रोत्साहनपर बक्षीस अनुदानाच्या रकमेपासून वंचित राहिले आहेत. दरम्यान निधी वितरित न झालेल्या या लाभार्थ्यांच्या प्रोत्साहनपर बक्षिसाची रक्कम त्यांच्या खात्यावर ३१ जानेवारीपर्यंत तात्काळ वितरित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.पायाभूत सर्वेक्षणाप्रमाणे १२ जानेवारी २०१८ रोजी बीड जिल्हा हागणदारी मुक्त घोषित करण्यात आला. परंतु शासनाच्या संकेतस्थळावर ६८ हजार कुटुंबांना लाभ दिल्याची नोंद दिसून येत नाही. संकेतस्थळावर नोंद न झाल्यामुळे या सर्व लाभार्थ्यांना लाभ दिला नाही अशा प्रकारचा संदेश जात आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर पायाभूत सर्वेक्षणाप्रमाणे आर्थिक नोंदी करावयाच्या यादीचे वाचन करावे तसेच या यादीनुसार काही तांत्रिक कारणामुळे निधी वितरित करणे शक्य झाले नसल्यास संबंधिताचे प्रस्ताव तात्काळ जमा करून निकाली काढावेत असेही आदेश दिले आहेत.आर्थिक नोंदी करताना आणि निधी वितरण करताना शासकीय नोकरदार, बहुधारक तसेच ग्रामपंचायत सदस्य अथवा प्रत्यक्षात एकत्र राहत असलेल्या कुटुंबातील परंतु विभक्त म्हणून नोंद केलेल्या कुटुंबांना लाभ दिला जाणार नाही याबाबत संपूर्ण खातरजमा करून पात्र लाभार्थ्यांना तत्काळ लाभ वितरित करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिका-यांनी आदेश दिले आहेत. या कामासाठी ‘३१ जानेवारी’ ही डेडलाईन दिली असून, यंत्रणा त्यादृष्टीने कामाला लागली आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाcivic issueनागरी समस्या