शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक ! अंबाजोगाईत एकाच तासात ६ कोरोना रुग्णांचा मृत्यू; स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 18:06 IST

6 corona patients die in one hour in Ambajogai : मृत्यू गंभीर आजारानेच झाल्याचा रुग्णालय प्रशासनाचा दावा

ठळक मुद्देबुधवारी दिवसभरात ११ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती 

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील कोविड कक्षात बुधवारी दुपारी एकाच तासात सहा जणांचे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तर दिवसभरात एकूण ११ कोरोना बाधितांचे मृत्यू झाले आहेत. गंभीर आजार व जास्त वय असल्याने रुग्णांचे मृत्यू झाल्याचे कारण प्रशासनाने दिले आहे.

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी दिवभरात ११ कोरोना रुग्णांचे निधन झाले आहे. तर दुपारी १ ते २ या वेळेत एकाच तासात सहा जणांचे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना कक्षाच्या अतिदक्षता विभागातील ३ आणि वार्ड क्रमांक-३ मधील ३ अशा सहा रुग्णांचा तासाभरात मृत्यू झाला. स्वाराती मधील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत चालल्याने चिंता व्यक्त होत आहे. 

मृतांच्या अँटीजेन टेस्ट केल्याने संशय गडद स्वाराती रूग्णालयात कोरोना संशयित रूग्णाचा मृत्यू झाल्यास त्याची आरटीपीसीआर चाचणी करून निगेटीव्ह आल्यास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जातो. आजच्या घटनेतील मयत रूग्णांची मात्र घाईगडबडीत अँटीजेन चाचणी करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपविल्याने प्रशासन काहीतरी लपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय गडद झाला आहे.

मृत्यू गंभीर आजारानेच झाल्याचा प्रशासनाचा दावाबुधवारी रात्री १२ ते आतापर्यंत कोरोनाच्या ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. झालेले मृत्यू हे दमा, हायपरटेंशन, उच्च रक्तदाब व इतर शारीरिक व्याधी यामुळे झाले आहेत. तसेच बहुतांश रुग्णांचे वय ६० पेक्षा जास्त आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन व्यवस्था सुरळीत आहे.- डॉ.शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, अंबाजोगाई.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूBeedबीड